८ जुलै रोजी शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, (market)घसरणीने उघडले होते. आज देखील शेअर बाजाराची सुरुवात घसरणीने होण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांनी काय सांगितलं आहे, जाणून घ्या.

८ जुलै रोजी काल शेअर बाजाराची घसरणीने सुरुवात झाली होती. जागतिक बाजारातील मिश्र संकेतांमुळे ९ जुलै रोजी आज बुधवारी भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी(market) ५०, घसरणीसह उघडण्याची शक्यता आहे. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी आज नकारात्मक सुरुवात दर्शवितात. गिफ्ट निफ्टी २५,५७७ च्या आसपास व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा जवळजवळ ३५ अंकांनी कमी होता. या सर्व संकेतांचा विचार करता असा अंदाज वर्तवण्यात आला आहे की, आज बुधवारी भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५० घसरणीसह उघडण्याची शक्यता आहे.
मंगळवारी, ८ जुलै रोजी देशांतर्गत शेअर बाजाराने तेजी दाखवली, बेंचमार्क निफ्टी ५० २५,५०० च्या वर बंद झाला. सुरुवात जरी घसरणीने झाली असली तरी काल दुसऱ्या सत्रात शेअर बाजारात(market) तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्स २७०.०१ अंकांनी म्हणजेच ०.३२% ने वाढून ८३,७१२.५१ वर बंद झाला, तर निफ्टी ५० ६१.२० अंकांनी म्हणजेच ०.२४% ने वाढून २५,५२२.५० वर बंद झाला. मंगळवारी बँक निफ्टी निर्देशांक ३०७.१० अंकांनी म्हणजेच ०.५४% ने वाढून ५७,२५६.३० वर बंद झाला. मंगळवारी निफ्टीवरील टॉप परफॉर्मर्समध्ये कोटक बँक, एटरनल आणि एशियन पेंट्स आघाडीवर होते. तर टायटन, डॉ. रेड्डी आणि बजाज ऑटो यांनी सत्राचा शेवट मोठ्या तोट्यात केला. पहिल्या सहामाहीत मोठ्या प्रमाणात घसरण झाल्यानंतर, दिवसाच्या दुसऱ्या सहामाहीत निफ्टी मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकात मोठी वाढ झाली.
आजच्या व्यवहारात टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील, युनियन बँक ऑफ इंडिया, डिक्सन टेक्नॉलॉजीज, टाटा मोटर्स, झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस, केपीआय ग्रीन एनर्जी, ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी, बाजेल प्रोजेक्ट, कंम्प्युटर एज मॅनेजमेंट सर्विस हे शेअर्स महत्त्वाचे ठरणार आहे. चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया यांनी गुंतवणूकदारांसाठी आज कार्ट्रेड टेक, बीएफ युटिलिटीज, वंडर इलेक्ट्रिकल्स, व्हॅलर इस्टेट आणि शेफलर इंडिया या शेअर्सची शिफारस केली आहे.
आज 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करण्यासाठी आज आलोक इंडस्ट्रीज, पार्श्वनाथ डेव्हलपर्स, एनएचपीसी आणि रेस्टॉरंट ब्रँड्स एशिया या शेअर्सची शिफारस तज्ज्ञांनी केली आहे. प्रभुदास लिल्लाधर येथील तांत्रिक संशोधन विभागाच्या उपाध्यक्षा वैशाली यांनी आज गुंतवणूकदारांसाठी कॅप्री ग्लोबल कॅपिटल , जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चर आणि पार्श्वनाथ डेव्हलपर्स या शेअर्सची शिफारस केली आहे. चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया यांनी आज गुंतवणूकदारांसाठी कार्ट्रेड टेक , बीएफ युटिलिटीज , वंडर इलेक्ट्रिकल्स , व्हॅलर इस्टेट आणि शेफलर इंडिया या शेअर्सची शिफारस केली आहे.
हेही वाचा :