10 लाखांच्या बजेटमध्ये ‘या’ 3 CNG Car असेल तुमच्यासाठी परफेक्ट, किंमत फक्त…

जर तुम्ही सुद्धा 10 लाखांच्या बजेटमध्ये उत्तम परफॉर्मन्स देणारी(performance) CNG कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

भारतीय मार्केटमध्ये इलेक्ट्रिक वाहनांना जोरदार मागणी मिळताना दिसत आहे. मात्र, असे जरी असले तरी अजूनही CNG कार्सची क्रेझ कमी झालेली नाही. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीत CNG कार्सना चांगली मागणी मिळत आहे. हीच मागणी लक्षात घेत, अनेक ऑटो कंपन्या मार्केटमध्ये नवीन(performance) कार लाँच करताना त्याचे CNG व्हेरिएंट देखील लाँच करत असतात. अशातच जर तुमचे बजेट 10 लाख रुपये असेल आणि तुम्ही एक चांगली CNG कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर बाजारात या कॅटेगरीतील कारसाठी अनेक उत्तम पर्याय उपलब्ध आहेत. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

मारुती सुझुकी अल्टो k10 सीएनजी :
भारतीय ऑटो बाजारात अल्टो K10 ही परवडणारी सीएनजी कार म्हणून खरेदी करता येते. अल्टो K10 1.0-लिटर पेट्रोल इंजिन सीएनजी मोडमध्ये 56 एचपी आणि 82.1 एनएम पीक टॉर्क (performance)निर्माण vकरते, जे पाच-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह जोडलेले आहे. या कारचे मायलेज 33.85 किमी/किलोग्रॅम असल्याचा दावा केला आहे.

टाटा पंच सीएनजी :
टाटा पंच पेट्रोल, इलेक्ट्रिक आणि सीएनजी प्रकारांमध्ये बाजारात उपलब्ध आहे. पंच आयसीएनजी आयकॉनिक अल्फा आर्किटेक्चरवर आधारित आहे, जे त्याच्या सर्वोत्तम सुरक्षा वैशिष्ट्यांसाठी ओळखले जाते. या कारमध्ये आयसीएनजी किट आहे, जे कारला कोणत्याही गळतीपासून वाचवते. जर कारमध्ये कुठेतरी गॅस गळती झाली तर या तंत्रज्ञानाच्या मदतीने कार आपोआप सीएनजी मोडवरून पेट्रोल मोडमध्ये बदलते.

मारुती स्विफ्ट :
नुकतीच मारुती स्विफ्ट सीएनजी व्हेरिएंटमध्ये बाजारात आली आहे. या कारमध्ये Z-सिरीज इंजिन आणि एस-सीएनजीचे कॉम्बिनेशन आहे, ज्यामुळे ही कार 32.85 किमी/किलो मायलेज देते. मारुती स्विफ्ट सीएनजी बाजारात तीन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. त्याच्या बेस आणि मिड व्हेरिएंटमध्ये स्टील व्हील्स वापरण्यात आले आहेत तर टॉप-व्हेरिएंटमध्ये पेंट केलेले अलॉय व्हील्स बसवण्यात आले आहेत.

मारुती स्विफ्टमध्ये स्मार्टप्ले प्रोसह 17.78 सेमी टचस्क्रीन आहे. या कारमध्ये यूएसबी आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी फीचर देखील देण्यात आले आहे. या कारच्या टॉप-व्हेरिएंटमध्ये रियर एसी व्हेंट्स देण्यात आले आहेत. या मारुती कारची एक्स-शोरूम किंमत 8.19 लाख रुपयांपासून सुरू होते.

हेही वाचा :

फडणवीसांकडून थेट सभागृहात जयंत पाटलांना भाजपा प्रवेशाची ऑफर?

‘या’ लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळणार?; जाणून घ्या पात्रता आणि संपूर्ण माहिती

क्रूरतेची मर्यादा ओलांडली! आधी बेदम मारहाण अन् नंतर मृतदेहावर नाचले लोक VIDEO VIRAL