शरद पवार गटातील ‘हा’ बडा आमदार अजितदादांच्या भेटीला, चर्चेला उधाण

विधानसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीमध्ये(political issue) अनेक बड्या नेत्यांची इनकमिंग दिसून आली. सर्वाधिक नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षात परतले. तर, निकालानंतर आता चित्र बदलले आहे. या निवडणुकीत महायुतीने दणदणीत विजय मिळवला. यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने दमदार कामगिरी करून दाखवली. तेच शरद पवार यांच्या पक्षाला फक्त 10 जागांवर समाधान मानावे लागले. अशात शरद पवार गटातील एका बड्या आमदाराने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे.

या भेटीमुळे राजकीय वर्तुळात (political issue)वेगवेगळ्या चर्चेला उधाण आलंय. काही दिवसांपूर्वीच स्वतः अजित पवार यांनी शरद पवार यांच्या 85 व्या वाढदिवशी दिल्लीत सहकुटुंब त्यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. यानंतर राष्ट्रवादीमध्ये पुन्हा मनो मिलाप होणार काय?, काका-पुतणे पुन्हा एक होणार काय? याबाबत चर्चा रंगल्या होत्या.

अशात राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर.आर.पाटील यांचे सुपूत्र आमदार रोहित पाटील यांनी नागपूरमध्ये अजित पवार यांची भेट घेतली. तर, दोन दिवसांपूर्वीच साताऱ्यातील शरद पवार गटाचे नेते शशिकांत शिंदे यांनीही अजितदादांची भेट घेतली होती. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी शशिकांत शिंदेंसारखे नेते दादांना असेच भेटणार नाहीत असं म्हटलं होतं.

यानंतर रोहित पाटील यांनी देखील अजित पवारांची भेट घेतल्याने अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. रोहित पाटील यांच्यानंतर सलील देशमुख देखील अजित पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले. सलील देशमुख अनिल देशमुख यांचे पुत्र आहेत. विधानसभा निवडणुकीत काटोलमध्ये सलील देशमुख यांचा पराभव झाला.

तर, रोहित पाटील हे तासगाव-कवठेमहाकाळमधून निवडून आले आहेत. रोहित पाटील यांनी अजितदादांची भेट का घेतली?, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र, या भेटीमुळे आता राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

हेही वाचा :

पाणी प्रदूषणामुळे मिरजेतील गणेश तलावात ६०० किलो मासे मृत

यंदा MPSC च्या वर्षभर परीक्षाच-परीक्षा; वेळापत्रकही जाहीर, सरकारी नोकरीचा प्रयत्न करणाऱ्यांना ‘अच्छे दिन’

मारहाण व मराठी भाषेला हिणवणाऱ्या शुक्लाला अटक करा अन्यथा…; मनसे आक्रमक