वर्षभरातून फक्त एकदाच खुलं होतं हे मंदिर; रक्षाबंधनाच्या दिवशी खच्चून भरते गर्दी

उत्तराखंडमधील चामोली जिल्ह्यात एक सुप्रसिद्ध मंदिर वसलं आहे जे फक्त(raksha) रक्षाबंधनाच्या दिवशीच खुलं होत. फक्त 12 तासांसाठीच हे मंदिर खुलं केलं जात. यंदाच्या रक्षाबंधनाला या मंदिराला भेट द्यायला अजिबात विसरू नका.

भारतामधील मंदिरांच्या कथा, त्यांची अद्वितीय रचना आणि त्यांच्याशी(raksha) संबंधित चमत्कारिक अनुभव आपल्या यात्रेला एक वेगळाच रोमांच देतात. देवभूमी उत्तराखंडमध्ये अनेक अद्भुत व चमत्कारी मंदिरे पाहायला मिळतात. या सुंदर पर्वतरांगांमध्ये एक असेही मंदिर आहे जे वर्षभर बंद असते आणि केवळ एका खास दिवशी, फक्त 12 तासांसाठीच उघडले जाते. या अनोख्या मंदिराबद्दल जाणून घ्यायचे असेल, तर ही माहिती नक्की वाचा.

ट्रॅव्हल इंडस्ट्रीची चिंता वाढली; सीमा वादावरून थायलँड आणि कंबोडियामध्ये सुरु अघोषित युद्ध

चमोली जिल्ह्यातील मंदिर जो वर्षभर बंद असतो

उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात वसलेला वंशी नारायण मंदिर हे एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे.(raksha) या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे ते वर्षातील 364 दिवस बंद असते. त्यामुळे भाविकांना येथे नियमित पूजा-अर्चा करण्याची संधी मिळत नाही. मात्र, एक विशेष दिवस असा असतो जेव्हा मंदिराचे दरवाजे फक्त 12 तासांसाठी उघडले जातात. त्या दिवशी येथे हजारो भाविकांची गर्दी उसळते आणि सर्वजण बंशी नारायण भगवानाचे दर्शन घेतात व त्यांचा आशीर्वाद मिळवतात.

मंदिराचे दरवाजे केव्हा उघडले जातात?

हे मंदिर फक्त रक्षाबंधनच्या दिवशीच उघडले जाते. त्या दिवशी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत मंदिर खुले असते. सूर्य मावळल्यावर मंदिर पुन्हा बंद केले जाते. पहाटेपासूनच दूरवरून भाविक येथे पोहोचतात आणि दरवाजे उघडण्याची वाट पाहत असतात.

बंशी नारायण मंदिराची पौराणिक कथा

हे मंदिर भगवान विष्णूंना समर्पित आहे. मान्यता आहे की, वामन अवतारातून मुक्त झाल्यावर भगवान विष्णु सर्वप्रथम याच ठिकाणी आले होते. येथे देवऋषी नारद यांनी भगवान नारायणाची पूजा केली होती, म्हणून असे मानले जाते की वर्षातील केवळ एक दिवस या मंदिराचे दरवाजे उघडले जातात.

रक्षाबंधनच्या दिवशीच का उघडते मंदिर?

या परंपरेमागे एक कथा आहे जी राजा बली आणि भगवान विष्णूंशी संबंधित आहे. सांगितले जाते की, राजा बलीने भगवान विष्णूंना आपल्या दरवाजाचे रक्षक होण्याची विनंती केली होती. भगवान विष्णूंनी ती विनंती मान्य करून ते पाताळात राजा बलीसोबत गेले. त्यांच्या अनुपस्थितीत देवी लक्ष्मीने नारद ऋषींच्या सल्ल्यानुसार श्रावण पौर्णिमेला राजा बलीला राखी बांधली, आणि त्यांच्याकडे भगवान विष्णूला परत पाठवण्याची विनंती केली. राजा बलीने ते मान्य केले आणि याच स्थळी भगवान विष्णु आणि लक्ष्मीदेवीचा पुनः मिलन घडले. म्हणून या ठिकाणी दरवर्षी रक्षाबंधनच्या दिवशीच मंदिर खुले केले जाते. असेही मानले जाते की पांडवांनी या मंदिराची स्थापना केली होती. या दिवशी येथे येणाऱ्या स्त्रिया भगवान बंशी नारायणाला राखी बांधतात, आणि त्यांच्या कुटुंबासाठी प्रार्थना करतात.

भगवान शिवाला समर्पित हे मंदिर बनले दोन देशांमधील लढाईचे कारण; काय खास आहे यात? जाणून घ्या

निसर्गसौंदर्य आणि विशेष वनस्पती

या मंदिराच्या आजूबाजूला दुर्मिळ फुलझाडे आणि वनस्पती आढळतात. संपूर्ण परिसर अतिशय निसर्गरम्य आणि शांततादायक आहे. मंदिराचा परिसर डोंगरदऱ्यांनी वेढलेला असून येथे आल्यावर एक अध्यात्मिक आणि सकारात्मक ऊर्जा जाणवते. उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील बंशी नारायण मंदिर एक अपूर्व धार्मिक आणि नैसर्गिक ठिकाण आहे. रक्षाबंधनच्या दिवशी या मंदिराचे दर्शन घेणे म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे. जर तुम्हालाही धार्मिकतेसोबत निसर्गाचा अनुभव घ्यायचा असेल, तर येथील यात्रा नक्कीच अविस्मरणीय ठरेल.

हेही वाचा :

रक्षाबंधनाआधीच बहिणीचा अक्राळविक्राळ चेहरा, भावाचा गळा दाबून…

महाराष्ट्र मंत्रिमंडळात ‘वाईल्ड कार्ड’ एन्ट्रीची शक्यता! शिंदेंकडून ‘मास्टरस्ट्रोक’, अजित पवार गटाला धक्का?

जैन समाजाचे एकत्रित आवाहन – JIO चा बहिष्कार करून माधुरीसाठी न्याय मागा