मागील काही काळापासून डार्क टुरिजमचा ट्रेंड फार वाढत चालला आहे. (tourism)अशातच तुम्हाला माहिती आहे का? देशात असे गाव आहे ज्याला काळ्या जादूची राजधानी म्हटले जाते, इथे अनेक रहस्यमयी गोष्टी अनुभवता येतील.

पर्यटन आपल्या आरोग्यसाठी चांगलं आहे, यामुळे कामाच्या त्रस्त जीवनातून आपली मुक्तता होते आणि मोकळ्या वातावरणामुळे आपले मनही शांत होते. आता पर्यटन म्हटलं की प्रत्येकाची(tourism) वेगवेगळी आवड असते, कुणाला समुद्रकिनारी भेट द्यायला आवडते तर कुणाला थंड हवेच्या ठिकाणी… त्यातच मागील काही काळापासून डार्क टुरिजमचा ट्रेंड फार वाढत चालला आहे. लोकांना भयानक आणि चित्तथरारक गोष्टींना भेट देऊन त्याचा अनुभव घेण्यास फार आवडते आणि म्हणूनच डार्क टुरिजमचा हा ट्रेंड दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
युनिक ट्रॅव्हल डेस्टिनेशन नेहमीच रोमांचाच्या शोधात असलेल्या पर्यटकांना आकर्षित करतात. अशाच एक खास ठिकाणाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. हे ठिकाण म्हणजे असाममधील “मायोंग” हे गाव. हे गाव केवळ जादूटोण्याच्या रहस्यमय गोष्टींसाठीच नव्हे, तर त्याच्या समृद्ध संस्कृती, प्राचीन हस्तलिखिते आणि लोककलेसाठी देखील प्रसिद्ध आहे. हजारो वर्षांपासून येथे तांत्रिक साधना केल्या गेल्याचा इतिहास असून, मायोंगला भारताची “काळ्या जादूची राजधानी” म्हणूनही ओळखले जाते. म्हणूनच, जर तुम्हाला काहीतरी हटके आणि थरारक पाहायचे असेल, तर या गावाची सफर एक उत्तम पर्याय ठरू शकते. साहसी पर्यटनाची आवड असेल तर या ठिकाणाला एकदा नक्की भेट द्या.
मायोंग हे गाव स्वतःमध्ये अनेक रहस्यं लपवून बसलेलं आहे. असं मानलं जातं की(tourism) ‘मायोंग’ हे नाव संस्कृतमधील ‘माया’ या शब्दावरून घेतले गेले आहे, ज्याचा अर्थ “भ्रम” असा होतो. या गावाशी संबंधित काही आश्चर्यचकित करणाऱ्या कहाण्या वेळोवेळी समोर येत असतात – जसं की लोक हवेतून अचानक गायब होणं किंवा माणसं प्राणी बनणं. अशा गोष्टी सोशल मीडियावरही वारंवार व्हायरल होतात. इथे फिरण्यासाठी तुम्ही “मायोंग म्युझियम ऑफ ब्लॅक मॅजिक”, “पोबितोरा वाइल्डलाईफ सेंच्युरी”, ब्रह्मपुत्र नदीकिनारी बोट राईड, स्थानिक तांत्रिकांशी संवाद आणि असामी लोकसांस्कृतिक नृत्याचा आनंद घेऊ शकता.
पौराणिक कथा काय सांगते?
आख्यायिकेनुसार, महाभारतातील राक्षस, हिडिंबा आणि भीमाचा मुलगा घटोत्कच हे याच गावाचे होते. येथील एक विचित्र गायब होण्याची घटना १३३० च्या दशकाची आहे. असे म्हटले जाते की तत्कालीन मुघल शासक मुहम्मद बिन तुघलकचे १,००,००० सैनिक या गावाजवळील जंगलात गायब झाले होते. एकही सैनिक सापडला नाही. औरंगजेबाच्या कारकिर्दीचा वृत्तांत असलेल्या ‘अलंजीरनामा’ मध्ये, दरबारी इतिहासकार मिर्झा मुहम्मद काझिम लिहितात की जेव्हा त्याने आसाममधील अहोम राज्याचा पराभव केला तेव्हा वीर राम सिंह अहोम सैन्यापेक्षा मायोंगच्या काळ्या जादूची जास्त भीती बाळगत होता. इथे अनेक ज्योतिषी आहेत जे हाताच्या रेषा वाचून भविष्य सांगतात. येथील अनेक वैद्य हे आजार दूर करण्यासाठी औषधांचा नाही तर आत्मे आणि भुतांची मदत घेतात.
इथे कसं जायचं?
लोकेशनबद्दल बोलायचं झालं, तर मायोंग गाव गुवाहाटी शहरापासून सुमारे ४० किलोमीटर अंतरावर पोबितोरा अभयारण्याजवळ वसलेलं आहे. गुवाहाटीहून तुम्ही बस किंवा टॅक्सीने सहज पोहोचू शकता. गुवाहाटी जंक्शन हे येथे येण्यासाठीचं सर्वात जवळचं रेल्वे स्थानक आहे. जर तुम्हाला भूत-प्रेतच्या गोष्टींमध्ये रस असेल आणि तांत्रिक विद्येविषयी कुतूहलाने जाणून घ्यायचे असेल तर या ठिकाणाला तुम्ही एकदा नक्की भेट द्यायला हवी.
हेही वाचा :
चाल शेकी-शेकी गाण्यावर चिमुकलीने केला झकास डान्स;गोड एक्सप्रेशन्सनी जिंकलं सर्वांचं मन
कोल्हापुरात पावसाची दमदार बॅटिंग; पंचगंगा नदी तिसऱ्यांदा पात्राबाहेर, अनेक धरणेही भरली