शेवटच्या दिवशी कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांचा रोड शो; भर उन्हात हजारो शिवसैनिक रस्त्यावर

तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री(streetstyle) एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुरात भव्य रोडशो केला. कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार खासदार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘टू व्हीलर रॅली’त सहभागी घेऊन महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्याची आवाहन केले.

यावेळी शिवसैनिकांनी केलेली गर्दी(streetstyle) पाहता अवघे शहर भगवेमय झाल्याचे चित्र होते. सांयकाळी प्रचाराची सांगता होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लावलेली उपस्थिती चर्चेचा विषय ठरली आहे. राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्याकडून या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

पश्चिम महाराष्ट्रात सर्वात महत्त्वाचे आणि राज्यात चर्चेचा विषय ठरलेली कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अत्यंत चुरशीची आणि अटीतटीची समजली जाते. महाविकास आघाडीकडून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती आणि महायुतीकडून खासदार संजय मंडलिक यांना उमेदवारी मिळाली आहे. गेल्या पंधरा दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चार वेळा कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत.

शनिवार पुन्हा ते कोल्हापूर दौऱ्यावर येऊन कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी विशेष जोडण्या लावण्याचा प्रयत्न करत असल्याचेही चित्र आहे. प्रचार संपायला अवघे काही तास शिल्लक असताना राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या वतीने करण्यात आलेल्या टू व्हीलर रॅलीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहभाग घेत उपस्थितांची मने जिंकली.

प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. उन्हाचा प्रचंड तडाका असतानाही शिवसैनिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी रस्त्यावर दाखल झाले आहेत. कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे दोन्ही उमेदवार प्रचंड मतांनी निवडून येतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी या दोन्ही जागा मिळवून हात बळकट करण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही सांगितले.

हेही वाचा :

इचलकरंजीत आज तिनही उमेदवारांकडून पदयात्रा

‘बावड्याचा पोरगा कोणासमोर झुकणार नाही’; सतेज पाटलांचा कोणाला उद्देशून इशारा?

लोकसभा निवडणुकीमुळे कोल्हापूर विमानतळ गजबजले; विमानांसह हेलिकॉप्टरची 195 ‘राजकीय उड्डाणे’