महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून पावसाची संततधार थोडी कमी झाली असली, तरीही 29 जुलै 2025 चा दिवस हवामानाच्या(weather) दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. विशेषतः कोकण आणि विदर्भ विभागातील काही जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबई, ठाणे आणि उपनगरांमध्ये आज ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी हलक्याशा सरी पडू शकतात. मात्र, या भागांसाठी कोणताही अलर्ट जारी करण्यात आलेला नाही. दुसरीकडे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र परिस्थिती सामान्य राहणार आहे.
पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा – काय आहे स्थिती? :
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाट भागांमध्येही हवामान(weather) विभागाने यलो अलर्ट दिला आहे. मात्र, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये बहुतांश ठिकाणी हवामान कोरडे राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नाशिक, जळगाव, नंदुरबार आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांत हलक्याफुलक्या सरी वगळता मोठ्या पावसाचा धोका नाही. या भागांमध्ये हवामान स्थिर राहण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली आणि जालना या जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. मात्र, या भागांमध्ये यलो अलर्ट नाही.
विदर्भात मुसळधार पावसाचा धोका, पाच जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट :
विदर्भ विभागात हवामानाचे(weather) चित्र वेगळे आहे. नागपूर, चंद्रपूर, भंडारा, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये जोरदार सरींची शक्यता आहे. यासाठी हवामान विभागाने यलो अलर्ट दिला असून नागरिकांनी पुरेशी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
30 जुलैनंतर पुढील काही दिवस राज्यात पावसाला विश्रांती मिळण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे कृषी आणि नागरी क्षेत्रांतील नागरिकांनी हवामानाच्या बदलत्या स्वरूपानुसार योग्य नियोजन करावे.
हेही वाचा :
रक्षाबंधनाआधीच बहिणीचा अक्राळविक्राळ चेहरा, भावाचा गळा दाबून…
जैन समाजाचे एकत्रित आवाहन – JIO चा बहिष्कार करून माधुरीसाठी न्याय मागा