आज श्रावणी शनिवार, महादेवाच्या कृपेने ‘या’ राशींचं भाग्य उजळणार!

आज 24 ऑगस्टरोजी श्रावणी शनिवार आहे. आज काही राशीच्या व्यक्तींवर(zodiac signs) महादेवाची कृपा राहील. त्यांना सुख-समृद्धी लाभेल. आज श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षात पंचमी तिथी सकाळी 7 वाजून 52 पर्यंत असेल, त्यानंतर षष्ठी तिथी सुरू होईल. तसेच आज चौथा श्रावणी शनिवार सुद्धा असणार आहे. याचा फायदा काही राशीना होणार आहे.

आजचा दिवस कुणासाठी कसा जाईल, याचे राशीभविष्य (zodiac signs)खाली दिले आहे. दैनिक राशिफळ हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी असते. यामध्ये मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या 12 राशींचे तपशीलवार वर्णन केले जाते.

मेष रास : व्यापारी वर्गासाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. तुमचा व्यवसाय पुढे कसा नेता येईल, याबाबत तुम्ही निर्णय घ्याल. आज नोकरीच्या नवीन संधी चालून येतील. वाहन खरेदीची इच्छा मनात येईल. आज कुटुंबासोबत चांगला दिवस जाईल.

वृषभ रास : आज मन भटकू देऊ नका. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. गुंतवणूक करताना जोखीम पत्करू नये. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस कौतुकाचा असेल. तुमच्या यशाचे गुणगान होईल. प्रवास योग आहे.

मिथुन रास : आज तुमच्यावर शंकराची कृपा राहील. तुमच्या सर्व मनोकामना आज पूर्ण होतील. आज धार्मिक कार्य करा. दान-धर्म करा. नक्कीच फायदा होईल. आज अडकलेले धन प्राप्त होण्याची शक्यता.(Horoscope Today)

कर्क रास : नवीन व्यवसायास गती मिळेल. तुमचा मान वाढेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. नोकरदार वर्गाला उत्तम दिवस. महिलांसाठी आजचा दिवस धावपळीचा असेल, त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या.

सिंह रास : आज तुम्हाला आवडीप्रमाणे विवाह स्थळ येतील. लग्नाचा योग जुळून येईल. प्रेम विवाह करण्यास अडथळा येणार नाही. आज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. महादेवाची कृपा राहील.

कन्या रास : लोकांकडून वाहवा मिळवाल. उत्तम सामाजिक दर्जा प्राप्त होईल. तुमचे प्रमोशन होण्याची शक्यता आहे. आज स्वादिष्ट जेवणाचा बेत बनेल. प्रेयसीसोबत खास क्षण व्यतीत कराल. आजचा दिवस स्मरणात राहण्यासारखा जाईल.

हेही वाचा:

जय शहा ‘आयसीसी’चे अध्यक्ष झाल्यास बीसीसीआयमध्ये कोण होणार नवा सचिव?

गवारीची भाजी खाण्याचे जबरदस्त फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

श्रीलंका-न्यूझीलंड कसोटी: सहा दिवसांचा ऐतिहासिक सामना