थायलँड आणि कंबोडियामध्ये सीमा वादावरून अघोषित युद्ध सुरु झालं आहे.(broken) अशा परिस्थतीत दोन्ही देशांमधील तणाव शिगेला पोहचला असताना त्याचा पर्यटनावर मोठा परिणाम होऊ लागला आहे. जाणून घेऊया सविस्तर.

2000 मध्ये बिहारपासून वेगळं होऊन झारखंड भारताचं 28वं राज्य बनलं.(broken) तेव्हापासून या राज्याच्या सौंदर्यात सातत्याने भर पडत गेली आहे. झारखंड आपल्या घनदाट जंगलांमुळे, कोळसा खाणींसाठी आणि अप्रतिम पर्यटन स्थळांसाठी प्रसिद्ध आहे. पतरातू घाटी, टॅगोर हिल, हुंडरू वॉटरफॉल, दशम वॉटरफॉल आणि नेतरहाटसारख्या ठिकाणी अनेक पर्यटक भेट देतात. मात्र तैमारा घाटीसारख्या रहस्यमय आणि थरारक ठिकाणांबद्दल फारच थोड्यांना माहिती असते.
तैमारा घाटी ही झारखंडमधील एक अतिशय भयावह ठिकाण म्हणून ओळखली जाते.(broken) ही घाटी रांची-जमशेदपूर हायवेवर (NH-33) आहे. ही राजधानी रांचीपासून सुमारे ३० किमी अंतरावर स्थित आहे. हायवेवर असल्यामुळे या ठिकाणाला अनेकदा ‘मृत्यूचा हायवे’ म्हणूनही ओळखलं जातं. हे ठिकाण घनदाट जंगलांमध्ये वसलेलं असल्याने रात्रीच्या वेळेस खूपच भयानक दिसतं आणि इथल्या दुर्घटनांमुळे लोक भयभीत असतात.
सिंहभूम जिल्ह्यात सापडला जगातील पहिला समुद्रकिनारा
एका संशोधनानुसार, जगातील पहिला समुद्रकिनारा भारताच्या झारखंड राज्यातील सिंहभूम जिल्ह्यात सापडला होता. TOI च्या वृत्तानुसार, ऑस्ट्रेलियातील प्रमुख वैज्ञानिक प्रियदर्शी चौधरी यांनी “सिंहभूम क्रॅटन” या भूप्रदेशातील जुना खडकांचा अभ्यास केला. या भागात ३.१ अब्ज वर्षांपूर्वीच्या झिरकॉन कणांचे रासायनिक विश्लेषण करण्यात आले, ज्यामुळे असे समोर आले की हे कण नदी व समुद्राच्या संपर्कात असलेल्या वातावरणात तयार झाले होते. म्हणजेच, हे भूभाग त्याकाळी समुद्रसपाटीवर होते. संशोधकांच्या मते, ३.३ ते ३.२ अब्ज वर्षांपूर्वी सिंहभूम भाग समुद्रसपाटीच्या वर आला आणि जगातील सर्वात जुन्या समुद्रकिनाऱ्यांपैकी एक ठरू शकतो.
पहिल्या खंडाचा निर्माण कसा झाला?
रिपोर्टनुसार, सिंहभूम भागात असे बलुआ दगड सापडले आहेत, ज्यामध्ये ३.२ अब्ज वर्षांपूर्वीच्या समुद्रकिनाऱ्याचे ठसे आहेत. पारंपरिक मते, खंडांचे निर्माण प्लेट टेक्टॉनिक्समुळे झाले असावे, पण या नवीन संशोधनानुसार, पृथ्वीच्या आतील लाव्हा (मॅग्मा) खूप महत्त्वाचा घटक होता ज्याने पहिला खंड तयार झाला.
पर्यटनासाठी आकर्षक ठिकाणे कोणती
पूर्व सिंहभूममध्ये अनेक सुंदर आणि आनंददायी पर्यटनस्थळं आहेत :
जुबली पार्क: सुंदर बागा, जलक्रीडा आणि शांत वातावरण.
डिमना लेक: पिकनिकसाठी उत्तम जागा, बोटिंग व जलक्रीडा उपल्बध.
टाटा स्टील जूलॉजिकल पार्क: विविध प्रकारचे प्राणी आणि पक्षी.
दलमा वाइल्डलाइफ सॅंक्च्युरी: ट्रेकिंग व वन्य प्राण्यांचं निरीक्षण.
जगातील Top 10 सुरक्षित शहरांची यादी आली समोर; भारताच्या एकही शहराचा समावेश नाही, या क्रमांकावर पटकावले स्थान
झारखंडचा प्रवास मार्ग:
रेल्वे मार्ग:
चाईबासा स्टेशन (पश्चिम सिंहभूम) – टाटानगर (जमशेदपूर) व राउरकेलाशी जोडलेलं.
टाटानगर स्टेशन (पूर्व सिंहभूम) – देशातील प्रमुख शहरांशी थेट जोडलेलं.
सड़क मार्ग:
रांची, जमशेदपूर, बोकारो यांसारख्या शहरांतून नियमित बससेवा.
NH-75 व इतर मार्गांद्वारे खासगी वाहनांद्वारे प्रवास शक्य.
हवाई मार्ग:
सर्वात जवळचं विमानतळ – रांची (बिरसा मुंडा एअरपोर्ट), सुमारे 150-180 किमी अंतरावर.
तिथून बस किंवा टॅक्सीने सिंहभूम गाठता येते.
झारखंड हे राज्य फक्त खाणी किंवा जंगलांसाठी नव्हे, तर त्याच्या नैसर्गिक, ऐतिहासिक आणि रहस्यमय ठिकाणांसाठीसुद्धा विशेष आहे. तैमारा घाटीसारखी भयावह जागा असो की सिंहभूमच्या भूप्रश्नांमागचं प्राचीन विज्ञान – झारखंड हे खऱ्या अर्थाने विविधतेने नटलेलं राज्य आहे.
हेही वाचा :