महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी(darshan)येणाऱ्या भाविकांना १ ऑगस्टपासून देवीचे मुख्य गाभाऱ्यातील दर्शन घेता येणार नाही. देवीचे दर्शन १ ते १० ऑगस्ट दरम्यान बंद राहणार असल्याचे मंदिर संस्थांकडून कळविण्यात आले आहे. या काळात भाविकांना केवळ मुख दर्शन घेण्याचीच सोय राहणार असल्याचे संस्थांकडून सांगण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील प्रमुख देवस्थानांपैकी एक असलेले महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी जात असतात. दरम्यान मंदिराचे जतन व संवर्धन करण्याच्या अनुषंगाने पुरातत्व खात्याकडून मंदिराचे जीर्णोधाराचे काम हाती घेण्यात आले आहे.(darshan) त्यानुसार आता देवीच्या सिंहाच्या गाभाऱ्यातील जीर्णोद्धाराचे काम सुरु करण्यात येत आहे. हे काम पुढील दहा दिवस चालणार आहे.
मंदिराच्या गाभाऱ्यातील दुरुस्तीवरून मागील काही दिवस वाद निर्माण झाला होता. मात्र पुरातत्व खात्याकडून अखेर काम सुरू करण्यात येत आहे. हे काम १ ते १० ऑगस्ट या कालावधीत करण्यात येणार आहे. यामुळे भाविकांना मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन देवीचे दर्शन घेता येणार नसून या कालावधीत भाविकांना फक्त मुखदर्शन घेता येणार आहे. (darshan)अर्थात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार नाही; यासाठी मुखदर्शन सुरु राहील.

दरम्यान पुढील दहा दिवसात मंदिराच्या गाभाऱ्याच्या जीर्णोद्धाराचे काम सुरु राहणार असले तरी आई तुळजाभवानी देवीच्या रोज होणाऱ्या सर्व धार्मिक विधी सिंहासन पूजा, अभिषेक पूजा हे नियमित सुरू राहणार असल्याची माहिती मंदिर संस्थानकडून देण्यात आली आहे. केवळ भाविकांसाठी गाभाऱ्यातील दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे.
हेही वाचा :
मोदींना भाजपची गरज नाही! खासदार निशिकांत दुबेंचं स्फोटक विधान
सांडपाणी गटारी साठी स्वामी मळा परिसरात नागरिक बसणार उपोषणाला* .