कोल्हापूर: ओरिसा राज्यातून विक्रीसाठी कोल्हापुरात आणला जाणारा १४ किलो गांजा(drugs) स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने ताब्यात घेतला आहे. ही कारवाई इचलकरंजी रोडवरील पंचगंगा कारखान्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा रचून करण्यात आली. या कारवाईत दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे नाथा पुषा माझी (वय ३३) आणि पिन्युएल डॅनियल रैत (वय १९, दोघे रा. सिकाबाडी, संबलपूर, ओरिसा) अशी आहेत. पकडलेल्या गांजाची(drugs) एकूण किंमत ३ लाख ५ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
गेल्या काही काळात कोल्हापूर आणि परिसरात गांजा विक्रीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यापूर्वी मिरज, सांगली, आटपाटी आणि सीमाभागातून येणाऱ्या गांजावर देखील कारवाई करण्यात आली होती. मात्र, बाहेरील राज्यांतून देखील गांजा येत असल्याचा संशय होता, जो या तपासादरम्यान स्पष्ट झाला.
विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी नुकत्याच घेतलेल्या बैठकीत अमली पदार्थांच्या रॅकेटला थांबवण्यासाठी कडक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या. स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांना मिळालेल्या माहितीनुसार, पथकातील अंमलदारांनी कबनूर परिसरात सापळा रचून या दोघा तरुणांना ताब्यात घेतले.
यावेळी, त्यांच्या बॅगची तपासणी केली असता १४ किलो गांजा आढळून आला. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, प्रकाश पाटील, सागर चौगले, अमित सर्जे, राजेश राठोड, महेश पाटील, आणि राजू येडगे यांचा सहभाग होता.
हेही वाचा:
जिओ कंपनीकडून ग्राहकांसाठी विशेष ऑफर्सची घोषणा, एक्स्ट्रा डेटा
आम्ही लाडक्या बहिणींना 2000 रुपये देणार; सांगलीत राहुल गांधींसमोरच खर्गेंची मोठी घोषणा
मोठी बातमी! महिलांना मिळणार 50000 रुपये, काय आहे नेमकी योजना?