भीमा कोरेगाव आयोगासमोर उद्या शरद पवार हजर राहण्याची शक्यता आहे.(appear)पवारांनी हजर राहावं, असा अर्ज कोरेगाव आयोगासमोर प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. त्यानुसार आयोगाने दोन वेळेस शरद पवारांना नोटीसा पाठवल्या आहेत. आता उद्या आयोगाची तारीख असून शरद पवार हजर राहतील का? हे पाहाणं महत्त्वाचं आहे. प्रकाश आंबेडकर यांनी दावा केला आहे की, शरद पवार यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले होते, ज्यात भीमा कोरेगाव येथील दंगल ही ‘घडवून आणलेली’ असल्याचा उल्लेख आहे.

आंबेडकर यांनी हे पत्र आयोगाच्या रेकॉर्डवर आणण्याची मागणी केली होती. आयोगाने ही मागणी मान्य करत पवार यांना नोटीस पाठवण्याचा निर्णय घेतला. आंबेडकर यांच्या मते, हे पत्र आयोगासमोर आल्यास दंगलीमागील सत्य समोर येईल आणि आयोगाला योग्य शिफारशी करणे सोपे होईल.प्रकाश आंबेडकर यांच्या विनंतीनुसार, आयोगाने शरद पवार यांना त्यांच्याकडील पत्र आणि संबंधित कागदपत्रे सादर करण्यासाठी नोटीस बजावली आहे.
आंबेडकर यांचे वकील ऍड. किरण कदम यांनी याबाबत आयोगाला विनंती केली होती, ज्याला आयोगाने मान्यता दिली. जर पवार यांनी हे पत्र सादर केले, तर त्याआधारे आयोग पुढील कारवाईचा निर्णय घेईल, ज्यात पवार यांना साक्षीसाठी बोलवण्याचा समावेश असू शकतो. त्यामुळे उद्या शरद पवार हजर राहतात की नाही? हे पाहाणं महत्त्वाचं आहे.
हेही वाचा :
वैष्णवी हगवणे प्रकरण भोवले! रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र
डोनाल्ड ट्रम्पचे ‘Air Force One’ जगात भारी; राजेशाही थाट पाहून तुमचेही डोळे दीपतील
हॉटेलमधून चेक आउट करताना रुममधील ‘या’ 5 वस्तू घरी घेऊन जाऊ शकता