चिंतनीय घटना घडल्या दोन; सांगा, त्याला जबाबदार कोण?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : महाराष्ट्रात सावित्रीच्या लेकी सुरक्षित नाहीत. त्यांची रोज कुठे ना कुठे विटंबना होत असते. ब्लॅकमेलिंग, बलात्कार, सामूहिक बलात्कार, लैंगिक शोषण, अशा विकृत प्रकारांना, प्रसंगांना(incidents) त्यांना सामोरे जावे लागते आहे. छत्रपती संभाजी नगर येथील बालसुधार गृहामध्ये, तसेच शहापूर येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये घडलेल्या प्रकाराने सामाजिक चिंता वाढली आहे. असे प्रकार का घडतात याच्या कारणांचा शोध घेऊन, त्यावर उपाययोजना काय करता येतील यासाठी समाजशास्त्रज्ञांनी पुढे आले पाहिजे. मार्गदर्शन केले पाहिजे.

छत्रपती संभाजी नगर येथे विद्यादिप नावाचे बाल सुधार गृह आहे. येथील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आले. तर तेथील नऊ मुलींनी पलायन केले. तसेच शहापूर येथील आर एस दमानिया इंग्लिश स्कूल मधील दहा ते बारा विद्यार्थीनींची त्यांना विवस्त्र करून त्यांना मासिक धर्म झाला आहे काय? याची केलेली तपासणी म्हणजे कमालीची विकृती आहे(incidents), स्कूल मधील मुख्याध्यापिकेसह अन्य महिला कर्मचारी यांच्याकडून झालेला हा प्रकार संताप जनक आहेच शिवाय या विद्यार्थिनींचा एक प्रकारे विनयभंग सुद्धा करण्यात आला आहे असे म्हणता येईल. या दोन्ही घटनांनी महाराष्ट्रातील सामाजिक चलबिचलता वाढली आहे.

सामाजिक चिंताही वाढली आहे. विशेष म्हणजे गेल्या काही वर्षांपासून सावित्रीच्या लेकींवरील अन्याय आणि अत्याचारात कमालीची वाढ झालेली आहे. शहापूर येथील इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिकांनी संबंधित विद्यार्थिनींच्या पालकांना विशेषता त्यांच्या मातांना बोलावून घेऊन तुमच्या मुलीच्या शारीरिक बदलांची माहिती देणे आवश्यक होते. तथापि त्यांनी पालकांना विश्वासात न घेता त्या विद्यार्थिनींना विवस्त्र करून त्यांची शारीरिक तपासणी केली. अशा प्रकारची शारीरिक तपासणी करण्याचे अधिकार स्त्रीरोगतज्ञांनाच आहे. त्यामुळे या स्कूलमध्ये घडलेल्या शारीरिक तपासणीचे समर्थन करता येणार नाही.

या विद्यार्थिनींनी घडलेला प्रकार घरी सांगितल्यानंतर पालक संतप्त झाले. त्यांनी स्कूल प्रशासनाला जाब विचारला(incidents). आता याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालकांच्या तीव्र प्रतिक्रियेनंतर पोलिसांनी त्याची देखभाल घेतली. गुन्हा दाखल केला. आता संबंधितांना अटकही होईल. म्हणजे विषय संपला असे नाही. भविष्यात असे प्रकार कोणत्याही शाळेमध्ये घडू नयेत म्हणून कठोर उपाय योजना केल्या गेल्या पाहिजेत.

छत्रपती संभाजी नगर येथील विद्यादीप बालसुधारकृहामध्ये घडलेला प्रकार अतिशय गंभीर आणि तितकाच संतापजनक आहे.
येथील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाले. आणि याच दरम्यान या सुधार गृहातील नऊ मुलींनी तेथील सुरक्षा भेदून पलायन केले. त्यापैकी सात मुलींना पोलिसांनी शोधून काढले. छोटा मोठा गुन्हा हातून घडल्यामुळे अल्पवयीन संशयीत आरोपीना, बाल सुधार गृहामध्ये ठेवले जाते.

जुवेनाईल कोर्टात त्यांच्याविरुद्ध खटला चालवला जातो. पण त्यांना शिक्षा ठोठावण्यापेक्षा त्यांच्या मानसिकतेत बदल करण्यासाठी, त्यांच्या वागण्यात सकारात्मकता आणण्यासाठी, एकूणच त्यांच्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी बाल सुधार गृहांची स्थापना करण्यात आलेली आहे. तथापि या ठिकाणी काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचीही मानसिकता सकारात्मक असणे गरजेचे आहे. सुधार गृहातील मुला मुलींकडे नकारात्मक दृष्टीने पाहिले गेले तर ते अन्यायाचे ठरते.

छत्रपती संभाजी नगर येथील” विद्यादिप “मधील व्यवस्थापन या घटनेला जबाबदार आहे असे म्हटले पाहिजे(incidents). तब्बल नऊ मुली तिथून पलायन करतात, किंवा तेथून पळून जाण्याची त्यांची मानसिकता तयार होते. याची समाज कल्याण विभागाच्या वतीने तसेच पोलीस प्रशासनाच्या वतीने चौकशी केली पाहिजे. व्यवस्थापनातील कर्मचारी किंवा अधिकारी या घटनेला जबाबदार असतील तर त्यांना विना विलंब निलंबित केले पाहिजे. समाजातील विचारवंतांनी, समाजशास्त्रज्ञांनी, अशा व्यवस्थेला काही प्रश्न विचारले पाहिजेत.

राज्यातील मध्यवर्ती कारागृहामध्ये काय चालले आहे याची अधून मधून गांभीर्याने चर्चा होत असते तशीच चर्चा राज्यातील बालनिरीक्षणगृहे, बाल सुधारगृहे यांच्या बद्दलही झाली पाहिजे. लोकांच्या पासून ही व्यवस्था तशी दुर्लक्षित असते. काही वर्षांपूर्वी कोल्हापूर शहरातील तेजस्विनी वस्तीगृहामध्ये तेथील कर्मचाऱ्यांच्या कडूनच मुलींवर अत्याचार करण्यात आले होते. तेव्हा महाराष्ट्रात खळबळ उडाली होती.

बालिका, अल्पवयीन मुली, तरुणी, महिला यांच्यावर अत्याचार होण्याचे प्रकार जाणवण्याइतके वाढलेले आहेत. त्याच्या कारणांचा शोध घेतला पाहिजे. सावित्रीच्या लेकींसाठी सुरक्षिततेचे आश्वासक वातावरण तयार केले पाहिजे. फुले शाहू आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात श्री सुरक्षित नसेल तर त्याच्या इतके दुर्दैव कोणतेही नाही. बालिका, अल्पवयीन मुली, अन्य महिला यांच्यावर अत्याचार करणाऱ्यांच्या विरुद्ध विना विलंब न्यायदान प्रक्रिया राबवली पाहिजे. अशा प्रकारच्या गुन्ह्यात हमखास कठोर शिक्षा होते असा एक संदेश पोहोचवला गेला पाहिजे.

हेही वाचा :

पगाराच्या थकबाकीवरून घंटागाड्या ठप्प, कामगारांच्या आंदोलनानंतरच काम सुरू

महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी! शिवरायांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश

सारा तेंडुलकरची आई अंजलीने गिलला बघून हसताच जडेजाने घेतली शुभमनची घेतली मजा, Video Viral