महाविकासआघाडीचा विधानसभेत मोठा पराभव झाला आहे. राज्यात महायुतीला 230 जागांवर बहुमत मिळालं. तर महाविकासआघाडीला मात्र मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं. यानंतर महाविकास आघीडच्या गटात महत्त्वाच्या घडामोडी घडताना दिसत आहेत. अशात उद्धव ठाकरेंनी आमदारांची बैठक बोलवली होती. यात महत्त्वाचे निर्णय(decision) घेण्यात आलेत. ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांना एक मोठी जबाबदारी पक्षाकडून देण्यात आली आहे.
![](https://smartichi.com/wp-content/uploads/2024/11/image-392-1024x819.png)
आदित्य ठाकरे यांची ठाकरे गटाच्या विधिमंडळाचे गटनेते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच सुनील प्रभू यांची पुन्हा एकदा ठाकरे गटाच्या प्रतोदपती नियुक्ती करण्यात आली आहे.
सभागृहातील आमदारांसाठी आदित्य ठाकरेंचा शब्द शिवसेना आमदारांसाठी अंतिम असणार आहे. यासह प्रतोद म्हणून सुनील प्रभू यांच्या सहीनेच शिवसेना ठाकरे गटाचे निर्णय(decision) होतील.
मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटाच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक घेेण्यात आली. या बैठकीत शिवसेना युबीटी पक्षाच्या गटनेते, प्रतोद संदर्भात निर्णय घेण्यात आहे.
या बेठकीत नवनिर्वाचित 20 आमदारांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतल्याची माहिती आहे. पक्षामध्ये पक्षप्रमुखांचा निर्णय हा अंतिम राहणार, पक्षाने घेतलेल्या निर्णयाशी सर्व आमदार बांधिल असतील, अशा आशयाचं हे प्रतिज्ञापत्र सर्व नवनिर्वाचित आमदारांकडून लिहून घेतल्याचं समजतंय.
दरम्यान, महाविकासआघाडीला मोठा फटका बसला. महाविकासआघाडीला फक्त 46 जागांवर समाधान मानावे लागले. यात काँग्रेस 16 जागा, ठाकरे गट 20 जागा आणि राष्ट्रवादी शरद पवार गट 10 जागा मिळाल्या.
हेही वाचा :
हात, मशाल, तुतारीमुक्त कोल्हापूर अगा जे पहिल्यांदा घडले!
दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये चाहत्याने स्टेजवर जाऊन थेट गर्लफ्रेंडला केलं प्रपोज
महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदासाठी बिहार पॅटर्न वापरला जाणार?