पत्नीच्या निधनानंतर एकटेपणा घालवणं नडलं, दुसऱ्या लग्नाचा प्लॅन पण भलतंच घडलं

अलिगढ – उत्तरप्रदेशमधील अलिगढ मधील ६२ वर्षाच्या व्यक्तीने लग्नाचं(marriage) स्वप्न पाहिलं. पत्नीच्या निधनानंतर एकट जीवन जगणाऱ्या व्यक्तीने लग्न करण्यासाठी मुलगी पाहायची सुरूवात केली. मॅरेज ब्यूरो मधून एक मुलगी संपर्कात आली होती. पण होणाऱ्या बायकोने आधीत असं काही केलं की ज्येष्ठ व्यक्तीला डोकं हाणून घेण्याची वेळ आली. नेमकं काय घडलं, जाणून घ्या.

अलिगढमध्ये ६२ वर्षीय व्यक्ती पत्नीच्या निधनानंतर एकटे राहत होते. वर्तमानपत्रात आलेल्या लग्नासंबंधीत(marriage) जाहिरातीवरील नंबरवर संपर्क केला. जाहिरातीवरील नंबरवरून मॅरेज ब्यूरो शी संपर्क केल्यावर पहिले तर रजिस्ट्रेशनसाठी ४५०० रूपये जमा केले. सर्व माहिती दिल्यानंतर त्याने त्यांच्यासोबत एका महिलेशी संपर्क करून दिला.

व्यक्तीचा ज्या महिलेशी संपर्क केला गेला, तिने तिच नाव अर्चना राजपूत आणि राहत ठिकाण मथुरा सांगितले. महिलेने आपण निवृत्त शिक्षिका असल्याचे सांगितले. मोबाईलवर काही काळ बोलल्या नंतर महिलेने त्या व्यक्तीचा लग्नाचा प्रस्ताव स्वीकारला. व्यक्तीचा आरोप आहे की, त्या महिलेने त्यांना मथुरेला बोलावले, पण तिने लग्नानंतरच भेटू असे सांगितले.

काही दिवसांनी स्वत: महिलेने मोबाईल वर सांगितले कि तिच्या बहिणीचा मध्यप्रदेशच्या ग्वालियर मध्ये अपघात झाला आहे. आणि तिच्या उपचारासाठी एक लाख रूपयाची गरज आहे. त्या महिलेच्या बोलण्यात अडकून तिने बोललेल्या खात्यात त्याने रक्कम पाठवली. यानंतर परत औषधांच्या नावाखाली १० हजार रूपये पाठवले.

मोबाईलवर ती महिला खोटे आश्वासन देत राहिली की दिलेली रक्कम परत पाठवली दिली जाईल. पण काही दिवसांनी तिचा नंबर बंद झाला. शेवटी वैतागून त्या व्यक्तीने मॅरेज ब्यूरोशी संपर्क केला तर सांगितलं गेलं की अर्चनाचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. तसेच त्यांना कुठल्यातरी दुसऱ्या महिले बरोबर लग्न करायला सांगितले आहे.

दरम्यान, संबंधित व्यक्तीला आपल्यासोबत फसवणूक झाली आहे हे लक्षात आले. मग त्यांनी सासनी गेट स्टेशनला तक्रार दाखल केली. गुन्हा दाखल झाल्यावर पोलीस तपास करत आहे. सध्या पोलीस तपासामध्ये बॅंक आणि मोबाईल ने फसवणुकदाराचा शोध घेत आहेत.

हेही वाचा :

भारताला अजून एक मोठा धक्का, बुमराहसह अजून एक वेगवान गोलंदाज संघाबाहेर

ऐसा लगानेका अन् रात्रभर बांगो बांगो बांगो; धनुभाऊंचा फोटो दाखवत धसांचा नवा गौप्यस्फोट

मकरसंक्रातीच्या गोडव्यात महागाईचा कडवटपणा! तिळाच्या दरात ‘इतक्या’ रुपयांची वाढ