‘पंढरपूरच्या वारीत अर्बन नक्षलवादी शिरले’,

पंढरपूरच्या वारीवरून समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी वादग्रस्त विधान केलं होतं.(entered)हा वाद शमत नाही तेच शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी नवीन आरोप केला आहे. ‘पंढरपूर वारीमध्ये काही लोक असे घुसले आहेत, असे धर्माला मानत नाहीत जे देवाला मानत नाहीत. हे सगळे अर्बन नक्षलवादी आहे, यांचा बंदोबस्त केला पाहिजे, अशी मागणी कायंदे यांनी केली. त्यांच्या या मागणीमुळे वाद पेटण्याची चिन्ह आहे.पावसाळी अधिवेशनामध्ये पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या अंतर्गत शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी वारीत अर्बन नक्षवादाचा मुद्दा मांडला. त्यांच्या या वक्त्यामुळे विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतला.

‘वारीमध्ये काही लोक असे घुसले आहेत असे धर्माला मानत नाहीत जे देवाला मानत नाहीत. वारीमध्ये विठ्ठलाचे भक्त मोठ्या संख्येने जातात. पंढरपूरच्या वारीमध्ये कोणी कोणाला निमंत्रण दिले नसतं पण लोक उत्स्फूर्तपणे जातात. परंतु वेगवेगळ्या बोगस नावाखाली काही संघटना जसे की संविधान दिंडी पर्यावरण दिंडी आहे. (entered)अनेक वारकरी हे बीजारोपण करत जातात. लोकायत अशी एक नावाची संघटना आहे या अशा संघटना वारीमध्ये पथनाट्य करतात, असे शो करतात. हे हिंदू धर्मीय नाही असं दिसत आहे, असा दावाचा कायंदेंनी केला.

‘कोणत्याही जाती धर्मावर मला टीका करायची नाही. परंतु ही मंडळी सकाळी आठ वाजता सासवड येथे पोहोचतात. त्यांच्या वारीचा संपूर्ण रूट देखील आहे. त्यात किंवा कोड सुद्धा आहेत जो ब्लॅकलिस्टेड आहे. त्यांना कोणाविषयी बोलायचं असेल तर ते बोलू शकतात. पण पंढरपूरच्या वारीचा अशाप्रकारे गैरफायदा ते घेत आहेत. (entered)हे डोक्यावर संविधानाचे पुस्तक घेत आहेत. अनेक वारकरी माथ्यावर तुळशीचे रोप असलेली कुंडी घेतात. तुम्हाला संविधानाचा प्रसार करायचा असेल तर तुम्ही करू शकता आम्ही सुद्धा संविधान मानतो. परंतु पंढरपूरच्या वारीमध्ये अनेक वारकरी महिला तुळशीचा रोप घेऊन चालतात. वारी हा धार्मिक विषय आहे’ असंही त्या म्हणाल्या.

हेही वाचा :

शेतकऱ्यांना भकास करून, शक्ती पीठ रस्त्यांचा विकास नको

महाविकास आघाडीत फूट पडणार? काँग्रेस मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

कोरोनाची लस देते मृत्यूला आमंत्रण? ICMR आणि AIIMS च्या अहवालात मोठा खुलासा…