टीग्रल कोच फॅक्टरी , चेन्नई यांनी 2025 साठी अप्रेंटिस पदांची भरती जाहीर केली आहे.(Recruitment)या भरती प्रक्रियेअंतर्गत 1,010 पदे भरली जाणार असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अधिकृत वेबसाइट pb.icf.gov.in वर 11 ऑगस्ट 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येईल. रेल्वे क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे.ही भरती आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित ट्रेडमध्ये आयटीआयचे प्रमाणपत्र प्राप्त केलेले असावे. उमेदवाराचे वय 15 ते 24 वर्षांच्या दरम्यान असावे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना सरकारच्या नियमानुसार वयोमर्यादेत सूट देण्यात येईल.

ICF अप्रेंटिस भरतीमध्ये उमेदवारांची निवड कोणत्याही परीक्षेशिवाय, केवळ मेरिट लिस्टद्वारे केली जाणार आहे. ही मेरिट लिस्ट दहावीमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे तयार केली जाईल. (Recruitment)ज्या उमेदवारांनी कोविड काळात पास मिळवले आहे, त्यांच्या बाबतीत 9वीचे गुणपत्रक किंवा 10वीच्या अर्धवार्षिक परीक्षेतील गुण विचारात घेतले जातील. जर दोन उमेदवारांचे गुण समान असतील, तर ज्याचे वय अधिक असेल त्यास प्राधान्य दिले जाईल. आणि जर वयही समान असेल, तर ज्या उमेदवाराने 10वी परीक्षा लवकर दिली असेल त्याला वरती स्थान दिले जाईल.अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ₹100 अर्ज शुल्क आणि त्यासोबत लागणारा सेवा शुल्क भरावा लागेल. मात्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दिव्यांग आणि महिला उमेदवारांना अर्ज शुल्कातून सूट देण्यात आली आहे.

अधिकृत वेबसाइट http://pb.icf.gov.in वर जा.
नवीन वापरकर्ता म्हणून रजिस्ट्रेशन करा – नाव, ईमेल, (Recruitment)मोबाईल क्रमांक यांसारखी माहिती भरा.
लॉगिन करून अर्ज फॉर्म भरावा.
आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत.
अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरा.
अंतिम सबमिशनपूर्वी सर्व माहिती तपासून फॉर्म सबमिट करा आणि त्याची एक प्रत सुरक्षित ठेवा.
ही भरती रेल्वे क्षेत्रात प्रवेश घेण्याचा उत्तम मार्ग आहे. यामुळे उमेदवारांना नोकरीसाठी एक ठोस दिशा मिळू शकते.
हेही वाचा :
शेतकऱ्यांना गुडन्यूज! राज्यात आता कृषी समृद्धी योजना सुरू
आनंदाची बातमी! सोन्याच्या दरात माठी घसरण, चांदीचे भाव स्थिर!
अरे देवा! पुन्हा एकदा डाऊन झाला OpenAI चा चॅटबोट, हजारो युजर्स वैतागले!