सोमवारी इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या एकदिवसीय सामन्यात भारताच्या १९ वर्षांखालील संघाला (monday)विजय मिळवता आला नाही. वॉर्सेस्टरशायरमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात इंग्लंडने टीम इंडियाचा सात विकेट्सने पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना भारताने ५० षटकांत नऊ गडी गमावून केवळ २१० धावा केल्या. इंग्लंडने ३१.१ षटकांत तीन गडी गमावून ही धावसंख्या गाठली.

भारताकडून वैभव सूर्यवंशी आणि आरएस अम्ब्रिस यांनी संघर्ष केला पण ते अपयशी ठरले. अम्ब्रिसने ८१ चेंडूत सहा चौकारांच्या मदतीने ६६ धावा केल्या आणि संघाला २०० धावांचा टप्पा ओलांडण्यास मदत केली. (monday) वैभवने सुरुवातीच्या षटकांमध्ये चांगली फलंदाजी केली आणि ४२ चेंडूत तीन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ३३ धावा केल्या. भारताने इंग्लंडला चांगली सुरुवात करू दिली नाही. चौथ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर दीपेश देवेंद्रनने जोसेफ मूर्सला बाद केले, यानंतर इंग्लंडचा संघ सावरला.
दुसरे सलामीवीर बीजे डॉकिन्स आणि बेन मेयेस यांनी शतकी भागीदारी केली. डॉकिन्सला पुष्पक नमनने ११३ धावांवर बाद केले. त्याने ५३ चेंडूत नऊ चौकार आणि तीन षटकारांसह ६६ धावा केल्या. (monday)रॉकी फ्लिंटॉफला १२१ धावांवर पुष्पकने बाद केले आणि इंग्लंडला तिसरा धक्का दिला. तो फक्त चार धावाच करू शकला.
यानंतर इंग्लंडला आणखी कोणताही धक्का बसला नाही. बेन आणि कर्णधार थॉमस रीव्ह यांनी संघाला विजय मिळवून दिला. बेनने ७६ चेंडूत ११ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ८२ धावा केल्या. थॉमसने ३७ चेंडूत सात चौकार आणि एका षटकारासह नाबाद ४९ धावा केल्या.या सामन्यात टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. टीमचा कर्णधार आयुष महात्रे पुन्हा एकदा अपयशी ठरला आणि पहिल्याच षटकात तो पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने फक्त एक धाव काढली.
विहान मल्होत्रा एका धावेपेक्षा जास्त धावू शकला नाही. यानंतर भारताने वैभव सूर्यवंशीची विकेटही गमावली. येथून राहुल कुमार (२१) आणि हरवंश पंगालिया (२४) यांनी चांगली सुरुवात केली पण ती मोठ्या डावात रूपांतरित करू शकले नाहीत. हा सामना गमावला असला तरी, भारताने मालिका ३-२ अशी जिंकली आहे. या मालिकेत वैभवने महत्त्वाची भूमिका बजावली कारण त्याने शानदार खेळी करून वादळ निर्माण केले आणि अनेक विक्रमही केले.
हेही वाचा :
सकाळच्या नाश्त्यात १० मिनिटांमध्ये झटपट बनवा खमंग कोथिंबीर पराठा, नाश्ता होईल पोटभर
धबधब्याच्या काठावर उभा राहून गर्लफ्रेंडला प्रोपोज करत होता, तितक्यात पाय घसरला अन्…Video
‘…तर तुझ्या पत्नीला माझ्या घरी आणून सोड’; दुकानदाराने सावकाराच्या जाचाला कंटाळून जीवन संपवलं