सुरेश हाळवणकर यांच्या व्हिडिओमध्ये छेडछाड करून सोशल मीडियावर व्हायरल

भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांच्या व्हिडिओमध्ये(social media management) छेडछाड करून तसा व्हिडिओ व्हॉट्सप ग्रुपवर व्हायरल केल्याची घटना घडली. याबाबत गावभाग पोलीस ठाण्यात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी स्क्रीनशॉट पुराव्यासह लेखी तक्रार दाखल केली आहे.

महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ आयोजित योगी आदित्यनाथ यांच्या जाहीर(social media management) प्रचार सभेत त्यांचे भाषण झाले होते. भाषणाचा व्हिडिओमध्ये विरोधकांनी सूडबुद्धीने मोडतोड करून राजकीय हितासाठी वापर करत सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. अनेक व्हाट्सअप ग्रुप भाजपा कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आला.

सुरेश हाळवणकर यांच्या व्हिडिओमध्ये छेडछाड करून सोशल मीडियावर व्हायरल

याची दखल घेत भाजपा कार्यकर्त्यांनी याबाबत पुराव्यासह लेखी तक्रार गावभाग पोलीस ठाण्यात दिली. यावेळी भाजपा सोशल मीडिया प्रमुख तक्रारदार सलीम शिकलगार, प्रदीप मळगे, उमाकांत दाभोळे, किशोर पाटील, शहाजहान टकळगी आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

कोल्हापुरात उद्या उडणार प्रचारांचा धडाका….

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का; माजी काँग्रेस अध्यक्षांचा भाजपमध्ये प्रवेश

शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना खोलीच्या बाहेर काढले?, Video Viral