विजय देवरकोंडाच्या अडचणीत वाढ, SC/ST कायद्यांतर्गत गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

तेलुगू अभिनेता विजय देवरकोंडा(Vijay Deverakonda) याच्या अडचणी वाढल्या आहेत. त्याचे जुने वादग्रस्त विधान सध्या खूपच चर्चेत आलं आहे. ज्यामुळे अभिनेत्यावर आदिवासी संघाने गुन्हा दाखल केला आहे. अभिनेता विजय देवरकोंडाच्या विरोधात सायबराबादच्या रायदुग्राम पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांचा आरोप आहे की, अभिनेत्याने आदिवासी संघाचा अपमान केला आहे. विजय देवरकोंडाच्या विरोधात SC/ST कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एप्रिल महिन्यात विजय देवरकोंडा(Vijay Deverakonda) हा अभिनेता सूर्याच्या ‘रेट्रो’ चित्रपटाच्या ऑडियो लॉन्च सोहळ्याला उपस्थित राहिला होता. याच कार्यक्रमाच्या ठिकाणी विजयने पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली. विजय देवरकोंडा म्हणाला की दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. त्यांनी लोकांना शिक्षित करण्याबद्दल विधान केलं. त्याचबरोबर तो असे देखील म्हणाला की पाकिस्तानचे लोक त्यांच्या सरकारला कंटाळले आहेत. विजयने तयांच्या भाषणाच्या वेळी शिक्षणावर जास्त भर देत होता.

त्याच वेळी विजयने आदिवासींबद्दल एक वादग्रस्त विधान केलं. ज्यामुळे तो वादात सापडला. विजय म्हणाला की, ‘आजही दहशतवादी त्याच प्रकारे लढतात ज्या प्रकारे आदिवासी 500 वर्षांपूर्वी लढत होते. आपण एकजूट राहून एकमेकांवर प्रेम केले पाहिजे. आपल्याला पुढे जाण्यासाठी नेहमीच एकत्र राहिले पाहिजे. यासाठी शिक्षण खूप गरजेचे आहे. जेव्हा आपण स्वतः आनंदी राहू आणि आपल्या पालकांना आनंदी ठेवू त्यावेळी आपण एकत्र प्रगती करू शकू असं तो म्हणाला.

विजय देवरकोंडाचे(Vijay Deverakonda) हे विधान आदिवासी संघाला आवडले नव्हते. त्यामुळे त्यांनी विजय देवरकोंडावर आरोप केला की, त्याने आदिवासी संघाचा अपमान केला आहे. दरम्यान, विजय देवरकोंडाने आदिवासी संघाच्या सर्व सदस्यांची माफी देखील मागितली आहे. यासाठी त्याने सार्वजनिक नोट जारी केले. यामध्ये त्याचा हेतू कोणालाही लक्ष्य करण्याचा नव्हता. तो अनेक वर्षांपासून आदिवासांची आदर करत आला असल्याचं त्याने सांगितले. परंतु, सध्या अभिनेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभिनेता विजय देवरकोंडा लवकरच ‘किंगडम’ या चित्रपटात दिसणार आहे. त्याचा हा चित्रपट 4 जुलै रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

हेही वाचा :

इस्रायल/इराण युद्धात, आता अमेरिका उतरली

Rishabh Pant अडचणीत! पंचांशी वाद पडेल महागात, लागणार बॅन?

Jio च्या या प्लॅनने घातलाय धुमाकूळ! संपूर्ण वर्षभराची व्हॅलिडीटी आणि रोज 2.5GB इंटरनेट