सांगली :राज्यातील तिसऱ्या टप्प्यातील निवडणूक प्रचाराच्या तोफा(ms teams) आज सायंकाळी 5 वाजता थंडावणार. त्यामुळे, पश्मि महाराष्ट्र,कोकण व मराठवाड्यातील येथील 11 मतदारसंघात शेवटच्या सभा होत असून शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरेंनी आज सांगली गाठली.
सांगलीतील महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी(ms teams) आदित्य ठाकरे सांगलीत आले होते, यावेळी काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदमही व्यासपीठावर होते. आदित्य ठाकरेंनी भाषणाच्या अगोदर एबीपी माझााशी संवाद साधला. त्यावेळी, भाषणापूर्वी सुरुवातालीच विशाल पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. तर, विशाल पाटील हे भाजपाची बी टीम असल्याचा घणाघात करत सांगलीत ठाकरेंनी प्रचाराची सुरुवात केली.
महाविकास आघाडीच्या जागावाटपात सांगलीतील जागा शिवसेनेला गेल्यानंतर विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी काँग्रेसकडून ही जागा आमच्या हक्काची असल्याचा दावा करत या जागेवरुन काँग्रेसचाच उमेदवार निवडणूक लढवणार अशी घोषणा सातत्याने करण्यात येत होती. तर, स्वत: विश्वजीत कदम हे विशाल पाटलांनी घेऊन दिल्ली दरबारीही जाऊन आले.
मात्र, शिवेसनेनं या जागेवरुन चंद्रहार पाटलांची उमेदवारी घोषित केल्यानंतर काँग्रेस व शिवसेना वाद रंगल्याचं दिसून आलं. अखेर, या वादावर वरिष्ठांनी पडदा टाकला अन् ही जागा शिवसेनेलाच देण्यात आली. त्यानंतर, विशाल पाटील यांनी बंडखोरी करत येथून आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. तरीही, विशाल पाटील आपला अर्ज मागे घेतील अशी अपेक्षा महाविकास आघाडीच्या नेत्यांना व काँग्रेसला होती. मात्र, विशाल पाटील ह्यांनी शेवटपर्यंत बंडाचे निशाण कायम ठेवले. त्यामुळे, सांगलीत यंदा तिहेरी लढत होत आहे.
मात्र, विशाला पाटील यांची उमेदवारी भाजपाला फायदा करण्यासाठी असल्याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे. त्यावरुनच, आदित्य ठाकरेंनी आपल्या सांगली दौऱ्यात भाषणापूर्वीच विशाल पाटील हे भाजपाची बी टीम असल्याचा हल्लाबोल केला. तसेच, तुमच्या घरी भाजपचे लोक येतील, बी टिमचे लोक येतील त्यांना सांगा 400 पार कसे करणार, असेही आदित्य यांनी म्हटले.
हेही वाचा :
सई ताम्हणकर दिसणार आणखी एका बॉलिवूड चित्रपटात
शेवटच्या दिवशी कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांचा रोड शो; भर उन्हात हजारो शिवसैनिक रस्त्यावर
मुख्यमंत्री कोल्हापुरात ठाण मांडून बसलेत, तरीही मी निवडणूक जिंकणार : राजू शेट्टी