आमच्या भावना समजून घ्या…, सांगलीच्या काँग्रेस मेळाव्यात विशाल पाटील समर्थकांनी घातला गोंधळ

सांगलीच्या काँग्रेस मेळाव्यामध्ये गोंधळ(support someone)झाल्याची घटना समोर आली आहे. अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या समर्थकांनी या मेळाव्यामध्ये गोंधळ घातला. ‘आमच्या भावना समजून घ्याव्यात.’, अशी मागणी यावेळी त्यांनी केली. काँग्रेसमध्ये बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेल्या विशाल पाटील यांच्यासंदर्भात आज निर्णय घेतला जाणार आहे. विशाल पाटील यांच्याविरोधात पक्षाकडून काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर(support someone) आज सांगलीमध्ये काँग्रेसच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. विशाल पाटील यांनी बंडखोरी केली यासाठीच या मेळव्याचे आयोजन करण्यात आले आहे. काँग्रेसचे सर्व वरिष्ठ नेत्यांनी या मेळाव्याला हजेरी लावली आहे. अशामध्ये ‘वरिष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या भावना समजून घ्याव्यात.’, असे म्हणत विशाल पाटील यांच्या समर्थकांकडून या मेळाव्यामध्ये गोंधळ घालण्यात आला आहे. विश्वजीत कदम यांचे भाषण सुरू असतानाच काही कार्यकर्तांनी जागेवरुन उठून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. अशामध्ये विश्वजीत कदम यांनी स्टेजवरून खाली येत कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

काँग्रेसच्या मेळाव्यात विशाल पाटील यांचे काही समर्थक सहभागी झाले आहेत. विशाल पाटील यांच्या समर्थकांनी या मेळाव्यामध्ये गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी विश्वजीत कदम यांचे भाषण सुरू असताना आपल्या भावना समजून घ्यावात अशी मागणी केली. विश्वजीत कदम यांनी काँग्रेसच्या मेळाव्यादरम्यान आपली भूमिका स्पष्ट केली. सांगलीमध्ये काँग्रेसवर जो अन्याय झाला आहे याचा वचपा मी भविष्यात काढणार असल्याचे मोठं विधान त्यांनी केले आहे.

या मेळाव्यात भाषण करताना विश्वजीत कदम यांनी सांगितले की, ‘सांगलीची जागा ही काँगेसला मिळाली पाहिजे हा आग्रह होता. आमच्यात गटबाजी होती. पण यावेळी आम्ही गटबाजीला पूर्णविराम दिला. एकच काँगेस पक्ष हा एकच गट. मला ही सतत लोकसभा लढवण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र मी विधानसभा लढवण्यावर ठाम राहिलो.

सांगलीची जागा काँग्रेसकडेच राहील असे सांगितले होते आणि आम्ही लोकांना सांगत गेलो की यंदा काँग्रेसचाच खासदार असेल. पण जागा वाटपाबाबत चर्चा सुरू झाल्यावर सांगली आणि कोल्हापूरचा संबंध कुठे आला. शाहू महाराज ज्या पक्षाकडून लढतील त्यावर ते लढती असे ठरले होते. मगं ठाकरेंनी सांगलीवर कसा काय हक्क सांगितला?’, असा सवाल विश्वजीत कदम यांनी उपस्थित केला.

हेही वाचा :

षटकार-चौकारांचा पाऊस पाडल्यानंतर ऋषभ पंतला मागावी लागली माफी!

सांगलीत विशाल पाटलांचा प्रचार करताना माजी आमदाराच्या गाडीवर दगडफेक

PM मोदींसह आता राहुल गांधींनाही निवडणूक आयोगाची नोटीस, उत्तरे द्यावी लागणार!