माझी वाट लागलीये प्लीज…, हात जोडून रोहित शर्माने कोणाला केली विनंती?

गेल्या काही दिवसांपासून रोहित शर्मा(rohit sharma)आणि मुंबई इंडियन्स मॅनेजमेंट यांच्यात आलबेल नसल्याचं दिसून येतंय. आगामी आयपीएलमध्ये रोहित मुंबईच्या टीमची साथ सोडणार अशीही चर्चा रंगू लागली आहे. अशातच काही दिवसांपूर्वी कोलकाता नाईट रायडर्सच्या अभिषेश नायरसोबत बोलताना रोहित शर्माचा एक ऑडियो लीक झाला होता. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. यानंतर लखनऊ सुपर जाएंट्सच्या सामन्यापूर्वी रोहित शर्मा कॅमेरामॅनला हात जोडून विनंती करताना दिसला.

वानखेडे स्डेडियमवर सामन्यापूर्वी रोहित शर्मा(rohit sharma) काही लोकांशी मैदानावर चर्चा करताना दिसला. यावेळी आजूबाजूला कॅमेरा असल्याचं रोहित शर्माला कळलं. तेव्हा रोहितने ताबडतोब कॅमेरामॅनला कॅमेरा बंद करण्याची विनंती केली. रोहितची ही घटना देखील कॅमेरात कैद झाली आहे. अभिषेत नायरसोबत झालेल्या प्रकरणानंतर रोहितने हा निर्णय घेतल्याचं म्हटलं जातंय. रोहित शर्माचा स्टंप माईक आवाज देखील व्हायरल होतात. त्याची गार्डनवाली क्लिप व्हायरल देखील झाली होती.

रोहित कॅमेरामॅनला म्हणतोय की, “भाई प्लीज ऑडियो बंद कर. खरं सांगतो त्या एका ऑडियोने माझ्या वाट लावली आहे.” हे सांगताना रोहित शर्माने कॅमेरामॅनसमोर चक्क हात जोडले आहेत. त्यावेळी त्याबाजूला उभ्या असलेल्या खेळाडूंना देखील हसू आवरलं नाही. रोहितचा हा व्हिडीओ सध्या तुफान शेअर देखील केला जातोय.

आयपीएल 2024 सुरू होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला गुजरात टायटन्समध्ये खरेदी केले होते. यानंतर रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सच्या नेतृत्वाची जबाबदारीही त्याच्याकडे सोपवण्यात आली होती. एमआय व्यवस्थापनाच्या या निर्णयामुळे चाहते प्रचंड संतापले होते.

संपूर्ण मोसमात मुंबई कॅम्पमधून खेळाडूंमधील मतभेदाच्या अनेक बातम्या समोर आल्या. त्याचा परिणाम एमआयच्या कामगिरीवरही दिसून आला. या संघाने 17 व्या मोसमात आतापर्यंत 14 सामने खेळले आहेत. या काळात 4 मध्ये विजय तर 10 मध्ये पराभव झाला आहे.

हेही वाचा :

गौतम गंभीरला टीम इंडियाचा कोच होण्याचा आग्रह

केजरीवालांच्या वक्तव्यावर मंचावर बसलेले शरद पवार का हसले ?

दहावी-बारावीच्या निकाला बाबत मोठी अपडेट