8 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत सर्वोत्तम कार शोधत आहात?(budget) तर मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे. आज आपण या बजेटमधील काही बेस्ट कार जाणून घेऊयात.

जर तुम्ही अशी कार शोधत असाल जी ट्रॅफिक, पार्किंग आणि(budget) लहान रस्त्यांवर सहज धावू शकते आणि तुमच्या बजेटमध्ये म्हणजे 8 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत येऊ शकते. तर मग, आज आपण अशाच काही कार्सबदल जाणून घेणार आहोत, ज्यात चांगला मायलेज, आवश्यक सेफ्टी फीचर्स आणि आरामदायी इंटिरिअर सुद्धा असेल.
मारुती सुझुकी स्विफ्ट
मारुती सुझुकी स्विफ्टबद्दल बोलायचे झाल्यास, ही कार नेहमीच सिटी ड्राईव्हसाठी एक परिपूर्ण हॅचबॅक राहिली आहे. त्याच्या नवीन अवतारात, स्टाइलसह, वायरलेस चार्जर आणि ऑटोमॅटिक(budget) क्लायमेट कंट्रोल सारखी फीचर्स देखील उपलब्ध आहेत. प्रवाशांच्या सेफ्टीसाठी, यात 6 एअरबॅग्ज, एबीएस, ईबीडी आणि ट्रॅक्शन कंट्रोल सारखी आधुनिक फीचर्स देण्यात आली आहेत. यात 1.2 लिटर, 3-सिलेंडर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन मिळते आणि नोएडामध्ये त्याची ऑन-रोड किंमत 7.38 लाख रुपयांपासून सुरू होते.
टाटा पंच
ज्यांना कमी बजेटमध्ये SUV सारखी उंची आणि ताकद हवी असेल तर त्यांच्यासाठी टाटा पंच हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. पंचची खासियत म्हणजे त्याचे 5-स्टार सेफ्टी रेटिंग, आणि त्यात सनरूफ, वायरलेस चार्जर आणि सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर सारखे फीचर्स देखील आहेत. याला 1.2 -लिटर 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन देखील मिळते आणि नोएडामध्ये या कारची किंमत 7.13 लाख रुपयांपासून सुरू होते.
सिट्रोएन सी3
जर तुम्ही फ्रेंच डिझाइन आणि पॉवरफुल टर्बो परफॉर्मन्स शोधत असाल, तर सिट्रोएन सी3 हा एक स्टायलिश आणि प्रशस्त पर्याय असू शकतो. त्यात 10.25 -इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर सारखी फीचर्स आहेत. या कारमध्ये 1.2L NA आणि 1.2L टर्बो पेट्रोल इंजिन पर्याय आहेत आणि त्याची किंमत 7.12 लाख रुपयांपासून सुरू होते.
ह्युंदाई ग्रँड आय10 निओस
ह्युंदाई ग्रँड आय10 निओस ही एक प्रीमियम-फीलिंग हॅचबॅक आहे, जी बजेटमध्ये उत्तम फीचर्स देते. या कारमध्ये वायरलेस चार्जर, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि अगदी क्रूझ कंट्रोल देखील येते. त्याचे 1.2 -लिटर पेट्रोल इंजिन शहरातील वाहतुकीत उत्तम परफॉर्मन्स देते. या कारची किंमत 6.88 लाख रुपयांपासून सुरू होते, ज्यामुळे ती या यादीतील सर्वात परवडणारी कार बनते.
मारुती सुझुकी बलेनो
जर तुम्हाला जास्त स्पेस, चांगली सेफ्टी आणि प्रीमियम फीचर्स असलेली हॅचबॅक हवी असेल, तर मारुती सुझुकी बलेनो हा एक उत्तम पर्याय आहे. त्यात हेड-अप डिस्प्ले, 360-डिग्री कॅमेरा आणि ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल सारख्या फीचर्सचा समावेश आहे. भारत एनसीएपी कडून मिळालेले 4-स्टार सेफ्टी रेटिंग या कारला सुरक्षित कारच्या यादीत आणते. याची किंमत 7.69 लाख रुपयांपासून सुरू होते.
हेही वाचा :
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! मोदी सरकार 4% महागाई भत्ता वाढवणार
भारतीय महिला संघ तिसऱ्या T20 सामन्यात कोसळला! इंग्लडने 5 धावांनी मिळवला विजय