लहान मुलाचं आधार कार्ड काढायचंय? ५ सोप्या स्टेप्स, घरीच मिनीटात होईल काम

सामान्य माणसाची ओळख म्हणजे आधार कार्ड. शाळा प्रवेश, सरकारी योजना,(steps) पासपोर्ट, बँक किंवा इतर महत्वाची कामे, या सर्व गोष्टींसाठी आधार कार्ड गरजेचं आहे. मोठ्या व्यक्तींसाठी जितकं आधार कार्ड गरजेचं आहे, तितकंच लहान मुलांसाठीही आधार कार्ड गरजेचं आहे. अनेक सरकारी योजनांसाठी आधार कार्ड महत्वाचे आहे. आधार कार्डशिवाय आपल्याला कोणत्याही योजनांचा लाभ घेता येणार नाही. जर आपलं आपत्य योजनांपासून वंचित राहू नये असं वाटत असेल तर आताच आधार कार्ड तयार करा.

बाळाच्या जन्मानंतर तत्काळ आधार कार्ड काढता येतं. लहान मुलांसाठी आधार कार्ड तयार करण्यासाठी जास्त कागदपत्रांची आवश्यकता नसते. फक्त जन्म प्रमाणपत्र आणि रूग्णालयाचे डिस्चार्ज पेपरची आवश्यकता असते.(steps) तसेच आई वडिलांपैकी एकाचे आधार कार्ड लागते. या कागदपत्रांच्या आधारे आपण मुलाचे आधार कार्ड तयार करू शकता.

आपण आधार कार्ड ऑनलाईन पद्धतीने काढू शकता. आधार केंद्राशिवाय अंगणवाडी केंद्रातही लहान मुलांचे आधार कार्ड तयार करता येते. जन्माच्या ५ वर्षांपर्यंत बायोमेट्रीक माहिती आवश्यक नाही.(steps) पण ५ वर्षानंतर बायोमेट्रीक अपडेट करणं बंधनकारक आहे.

ऑनलाईन पद्धतीने आपण लहान मुलांचे आधार कार्ड काढू शकता. यासाठी सोपी रजिस्ट्रेशन प्रक्रिया जाणून घेऊयात.

स्टेप १: सर्वात आधी युआयडीएआयच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. नंतर त्या ठिकाणी आपल्याला अनेक पर्याय दिसतील.

स्टेप २: ‘Book an appointment’ या पर्यायावर आधी क्लिक करा.

स्टेप ३: त्या ठिकाणी शहर किंवा केंद्र निवडा. नंतर त्यात बाळाचं नाव, जन्मतारीख, पालकांची सविस्तर माहिती भरा. नंतर Appointment बुक करा.

स्टेप ४: नंतर आपल्याला वेळ आणि तारीख दिली जाईल. दिलेल्या वेळेनुसार, आधार केंद्रावर जा. त्या ठिकाणी आवश्यक कागदपत्रे सादर करा.

स्टेप ५: जर बाळाचे ५ वर्ष पूर्ण झाले असतील तर, बायोमेट्रीक्स प्रोसेस पूर्ण करा.

१४ ते २१ दिवसांत पोस्टाने किंवा ईमेलद्वारे आपल्याला ई आधार मिळेल. किंवा आपण हर युआयडीएआयच्या वेबसाईटवरूनही डाऊनलोड करू शकता.

हेही वाचा :

शंभर कोटी रुपयांचे रस्तेच चोरीला गेलेत !

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात निवडणूक आयोगाने घेतला मोठा निर्णय!

Honor चा नवीन दमदार 5G Smartphone भारतात लाँच, 108MP कॅमेरा आणि 6600mAh बॅटरी… किंमत तुमच्या बजेटमध्ये