हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्यातील विविध भागात जोरदार पाऊस(heavy rain) कोसळत आहे. अनेक ठिकाणी नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत तर काही ठिकाणी या पावसाचा शेती पिकांना फटका बसलाय. दरम्यान, आजही राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज मराठवाड्यातील विविध जिल्ह्यात पावसाचा(heavy rain) यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर विदर्भातही पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाड्यातील धाराशीव, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर भंडारा गोंदिया वगळता संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.
परभणी शहरात सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस झालाय,एकच तास झालेल्या पावसामुळे शहरातील रस्त्यांवर पाणीच पाणी झाले आहे. यंदा महानगरपालिकेकडून नालेसफाई केली नसल्याने सातत्याने परभणी शहरातील राष्ट्रीय महामार्गावर पाणी साचून रस्त्याला नदीचे स्वरूप प्राप्त झालंय. आज पुन्हा एकदा याच ठिकाणी गुडघ्याएवढे पाणी साचले आहे.
ज्यामुळे परभणीकडून वसमतकडे जाणारी आणि वसमतकडून परभणीकडे येणारी वाहतूक मंदावली आहे. परभणी जिल्ह्यातील विविध भागात आज वादळी वारे विजासह पाऊस झालाय. गंगाखेड तालुक्यात तर विजांचे तांडव पाहायला मिळाले. तालुक्यात 4 ठिकाणी वीज कोसळून 8 ते 10 जनावरं मृत्युमुखी पडली आहेत. शिवाय एका महिला यामध्ये गंभीररित्या जखमी झाली आहे.
लातूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावलीये. औसा परिसरात तुफान पाऊस झालाय. दरम्यान, काढणीला आलेल्या सोयाबीनला मोठा फटका बसलाय. सोयाबीनच्या अनेक बनीम गेल्या वाहून गेल्या आहेत.
आज सकाळपासूनच लातूर जिल्ह्यात अनेक भागात पावसाच्या मध्यम आणि हलक्या सरींनी हजेरी लावली होती. सकाळी पाच वाजल्यापासून दुपारी बारा वाजेपर्यंत अनेक ठिकाणी पावसाची हजेरी होती. दुपारनंतर पावसाने उघडीप घेतली होती. मात्र संध्याकाळच्या सुमारास औसा परिसरातील उजनी, टाका…मासूर्डी..तुंगी …तुंगी बुद्रुक… या भागात पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे. उजनी अनेक घरात पाणी शिरले आहे.
हेही वाचा:
सुवर्णसंधी! CV ठेवा तयार, IT कंपन्यांमध्ये भरती सुरु
सरकारी कार्यालयातच शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न; विष प्राशन केले अन्…
सरकारचा महिलांसाठी ऐतिहासिक निर्णय; ‘त्या’कठीण दिवसांत मिळणार पगारी सुट्टी