दिवाळीआधी राज्याला मिळणार नवं सरकार; ‘या’ तारखांना विधानसभेचं मतदान?

प्रियकर लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच राज्यातील विधासभा निवडणुकीचाही(Diwali) मुहूर्त शोधला जात आहे. महाराष्ट्र विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबरला संपणार असल्याने त्या आधी म्हणजे येत्या ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या निवडणुकांचा बार उडू शकतो. 20 ते 26 ऑक्टोबरला मतदान Voting पार पडण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालासाठी अजूनही आठ दिवसांचा(Diwali) कालावधी शिल्लक आहेत. मात्र, निकाला आधीच विधानसभेची गणित मांडण्यात राजकीय नेत्यांनी सुरुवात केली आहे. महाराष्ट्र विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबरला संपत असल्याने अवघ्या सहा महिन्यात ही निवडणूक होईल. महाराष्ट्र विधानसभेची मुदत जरी 26 नोव्हेंबरला संपत असली तरी हरियाणा विधानसभेची मुदत 3 नोव्हेंबरला संपत आहे. या दोन्ही विधानसभा निवडणुका एकत्रच घेण्यात येणार असल्याने ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या निवडणुका पार पाडण्याची शक्यता आहे.

यंदा दिवाळी 29 ऑक्टोबर ते 29 नोव्हेंबर या कालावधीत आहेत. सणासुदीच्या काळात निवडणुका न घेण्याचे संकेत आहेत. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच विधानसभा निवडणुकीचे बार उडणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील मतदान पार पडल्यानंतर दिल्ली आणि इतर राज्यात सहाव्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील भाजपचे नेते प्रचारासाठी गेले. मात्र, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठक घेत विधानसभेच्या तयारीला सुरुवात केली. त्यामुळे लोकसभेच्या निकालापूर्वीच भाजप विधानसभेच्या तयारीला लागल्याचे चित्र आहे.

हेही वाचा :

राज्यात अनेक भागांत वादळी वाऱ्याचा धुमाकूळ, पाच जणांचा मृत्यू

मॅच जिंकल्यानंतर शाहरुख झाला भावूक ; वडिलांच्या मिठीत लेक रडली

दहावीचा आज निकाल! विद्यार्थ्यांना ‘या’ संकेतस्थळावरून पाहाता येणार निकाल