“आपण बिहारच्या मार्गाने चाललोय”; शिंदे गटाच्या ‘या’ नेत्यानं नेतृत्वावर केला हल्ला

महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार काल 15 डिसेंबरला पार पडला आहे. यावेळी मंत्रिमंडळात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. तसेच या मंत्रिमंडळ विस्तारात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस(political updates) अशा एकूण 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. परंतु, या मंत्रिमंडळ विस्तारानंतर महायुतीच्या तिन्ही पक्षांमध्ये नाराजी नाट्य सुरु झाले आहे. अशातच आता शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी मंत्रीपद न मिळाल्याने प्रचंड संताप व्यक्त केला आहे.

शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे म्हणाले की, “माझ्यासाठी मंत्रिपद इतकं महत्त्वाचं नाही. मला लोकांनी निवडून दिलं आहे, त्यामुळे मला त्यांच्यासाठी काम करायचं आहे. पण दु:ख एवढंच आहे की, महाराष्ट्र(political updates) नेमका चाललाय कुठे? तसेच तुम्हाला विभागीय दिले जायचे. तर पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ यासारख्या लोकांच्या हातात सत्ता देत महाराष्ट्र आम्ही पुढे नेला होता. परंतु, आपण कुठे तरी आता मागे चाललोय. तसेच आपण बिहारच्या मार्गाने चाललोय” असं देखील विजय शिवतारे म्हणाले आहेत.

याशिवाय मला नाव कट झाल्याबद्दल अजिबात दु:ख नाही. पण ज्या पद्धतीने विश्वासात घेऊन काम करायला हवं, पण ते न झाल्याने 100 टक्के माझी नाराजी आहे. कारण आता अडीच वर्षानंतर मंत्रिपद दिलं तरी मी घेणार नाही. कारण मला मंत्रिपदाची मला गरज नाही.

माझ्या मतदारसंघातील कामे मुख्यमंत्री आणि इतरांकडून करुन घेणे, इतकंच माझं काम आहे. त्यामुळे मंत्रिपदावरुन मला राग नाही. पण वागणुकीवरुन मात्र मला प्रचंड राग आहे” असं देखील शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा :

सलमान खानच्या चाहत्यांना मिळणार लवकरच आनंदाची बातमी

‘लाडकी बहीण’चा अर्ज झाला मंजूर, एकही हप्ता नाही ; निकषांच्या अंमलबजावणीची चर्चा

‘….तोपर्यंत मी भारतात शो करणार नाही’; दिलजीत दोसांझने लाईव्ह शोमध्ये केली घोषणा