संकटग्रस्तांच्या पाठीशी नक्कीच उभे राहू ; पवार

‘‘मणिपूर येथील स्थिती अत्यंत गंभीर असून महिलांवर (severe)अत्याचार झाले आणि समाजाचे दोन भाग झाले. मणिपूरच्या प्रकरणात केंद्र व राज्य सरकारची भूमिका ही अत्याचारग्रस्तांना आधार व संरक्षण देणारी तर अत्याचार करणाऱ्यांवर कारवाई करणारी असायला हवी होती, परंतु दोन्ही सरकारनी ती जबाबदारी पार पाडलेली नाही.

दौंड : ‘‘मणिपूर येथील स्थिती अत्यंत गंभीर असून महिलांवर अत्याचार झाले आणि समाजाचे दोन भाग झाले. मणिपूरच्या प्रकरणात केंद्र व राज्य सरकारची भूमिका ही अत्याचारग्रस्तांना आधार व संरक्षण देणारी तर अत्याचार करणाऱ्यांवर कारवाई करणारी असायला हवी होती, परंतु दोन्ही सरकारनी ती जबाबदारी पार पाडलेली नाही. (severe)पंतप्रधान हे देशाच्या कानाकोपऱ्यात जातात, परंतु ते मणिपूरमधील अत्याचाराचा उल्लेखही करीत नाहीत. म्हणून जेथे अन्याय, अत्याचार आणि धर्मावर संकट उभे राहील तेथे संकटग्रस्तांच्या पाठीशी उभे राहण्याचे काम निश्चित करू.’’ असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.

दौंड शहरात रविवारी (ता. ७) लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी आले होते. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी त्यांनी शहरातील नॉर्टन चर्च आणि पेंटीकोस्टल फेथ मिनिस्ट्री चर्चला भेट देत ख्रिस्ती आणि मातंग समाजातील नागरिकांशी संवाद साधला. त्यांनी मातंग समाजाच्या चिंतन बैठकीत या समाजाच्या मागण्या ऐकून घेतल्या. आचारसंहिता लागू असल्याने त्याविषयी अधिक भाष्य न करता समस्या सोडविण्याचे त्यांनी आश्‍वासन दिले.

‘ख्रिस्ती समाजाचे योगदान अव्वल’

भारतातील शिक्षण आणि वैद्यकीय मदत या दोन महत्त्वाच्या क्षेत्रांमधील योगदानाचा आढावा घेतला तर ख्रिस्ती समाजाचे योगदान अव्वल दर्जाचे आहे. प्रभू येशू ख्रिस्त यांच्या सेवा प्रवृत्तीच्या विचारांचे पालन करताना ख्रिस्ती समाजाने कोणतीही अपेक्षा न बाळगता उत्तम प्रकारे शिक्षण संस्था, आरोग्य केंद्र उभारून ती उत्तम पद्धतीने चालविली असल्याचे शरद पवार यांनी व्यक्त केले.

हेही वाचा :

ऐन लग्नसराईच्या तोंडावर सोन्याच्या भावात दररोज बदल

स्वतःसाठी दररोज एक तास द्या, निरोगी आयुष्यासाठी डॉक्टरांचा सल्ला

खासदारांची तिकिटं कापल्याने शिंदेंचे आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात?