ओव्हरटेक करायला गेला अन् दोन बसच्या मधोमध जाऊन अडकला, Viral Video 

सध्याच्या या युगात अपघातांचे प्रमाण फार झपाट्याने वाढत आहे. लोक चालू रस्त्यावर वाटेल तशी गाडी चालवतात आणि आपल्या शुल्लक चुकीमुळे अपघाताला(accident) बळी पडतात. तसेच अनेकजण वाहतुकीच्या नियमांचेही पालन करत नाहीत ज्यामुळे अपघात घडून येतात. आता हेच बघा ना आपल्या अतिघाईमुळे एक तरुण अशा पेचात सापडतो की त्याला तिथून पुढेही जाता येत नाही आणि मागेही. आपला अतिशहाणपण आपल्याला कसा नडू शकतो याचे उत्तम उदाहरण तुम्हाला आजच्या या व्हायरल व्हिडिओतून पाहायला मिळेल.

‘अति घाई संकटात येई’ ही म्हण तर तुम्ही आजवर अनेकदा ऐकली असेल मात्र याचे वास्तविक उदाहरण तुम्हाला अजच्या या व्हायरल व्हिडिओत पाहायला मिळेल. रस्त्यावर गाडी चालवताना स्वतःच्या आणि इतरांच्या जीवाची काळजी घेणे तसेच वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन वेळोवेळी चालकांना दिली जाते मात्र आपल्या शुल्लक चुकीमुळे चालक आपला आणि दुसऱ्याचाही जीव धोक्यात टाकतात आणि अपघातास(accident) बळी पडतात. सध्याच्या व्हायरल व्हिडिओमध्येही असाच काहीसा प्रकार दिसून दिला. यात घाईत जाण्याच्या नादात दुचाकीस्वार दोन बसच्या मध्येच अडकला. यांनतर पुढे काय घडले ते सविस्तर जाणून घेऊयात.

तर व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, यात चालू रस्त्यावरील एक भीषण दृश्ये दिसून येत आहे. घडते असे की, घाईघाईत एक दुचाकीस्वार बसला ओव्हरटेक करायला जातो मात्र असे करण्याच्या नादात तो दोन बसच्या मधोमध जाऊन अडकतो. जाण्यासाठी तो दोन बसच्या मधून आपला आपली गाडी टाकतो मात्र त्याचा हा प्रताप सपशेल फेल जातो. ही घटना घडते तेव्हा बसमधील सर्व प्रवासी चालकाकडे पाहू लागतात. सर्वांना त्याच्या या प्रकारचे आश्चर्य वाटते. मात्र नंतर बस कंडक्टर त्याची मदत करून हळूहळू पुढे गाडी नेण्यास त्याला सांगतो आणि मोठ्या दुर्घटनेपासून बचाव करतो.

बाईकस्वाराचा हा व्हायरल व्हिडिओ @DriveSmart_IN नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला हजारो व्युज मिळाले असून अनेकांनी यावर कमेंट्स करत घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “दोन मोठी वाहने बस किंवा ट्रकमध्ये कधीही जाऊ नका, जोपर्यंत पटकन जाण्यासाठी पुरेशी जागा नसेल” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मूर्खपणाला सीमा नसते”.

हेही वाचा :

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का: बड्या नेत्याने सोडली साथ

सर्वात मोठी बातमी! शरद पवारांची प्रकृती खालावली

काय सांगता! राज्य सरकार शाहरुख खानला देणार ९ कोटी