आतापर्यंत कधीही आजोयित केलेल्या देशाने टी-20 (icc t20) वर्ल्डकप जिंकलेला नाही. यंदाच्या वर्षीही याची पुनरावृत्ती झाल्याचं दिसून आलं आहे. टी-20 वर्ल्डकप 2024 मधून वेस्ट इंडिजची टीम बाहेर पडली आहे. त्यामुळे हा अनोखा रेकॉर्ड तुटू शकला नाही. T20 वर्ल्डकपची सुरुवात 2007 साली झाली. 2007 T20 वर्ल्डकप ते 2024 T20 वर्ल्डकप पर्यंत, या ICC स्पर्धेचे यजमानपद मिळालेल्या प्रत्येक देशाला विजेतेपद मिळवण्यात अपयश आलंय. सोमवारी, दक्षिण आफ्रिकेने सुपर-8 सामन्यात वेस्ट इंडिजचा (DLS) 3 गडी राखून पराभव करून T20 वर्ल्डकप 2024 मधून बाहेर पडले.
काही क्षणात वेस्ट इंडिजच्या आशांवर फेरलं पाणी
वेस्ट इंडिजची टीम 2024 च्या टी-20 (icc t20) वर्ल्डकपचं जेतेपद जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानली जात होती. मात्र यावेळी त्यांची स्वप्नं क्षणातच भंगल्याचं पहायला मिळालं. वेस्ट इंडिजची टीम सलग तिसऱ्यांदा T20 वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये स्थान मिळवू शकली नाही. वेस्ट इंडिज संघ 2021 T20 वर्ल्डकप, 2022 T20 वर्ल्डकप आणि आता 2024 T20 वर्ल्डकप सेमी फायनलपूर्वीच बाहेर पडली. 2024 टी-20 वर्ल्डकपमधून बाहेर पडल्यानंतर वेस्ट इंडिजचे खेळाडू भावूक झाले होते. वेस्ट इंडिजच्या खेळाडूंचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय ज्यामध्ये सर्व वेस्ट इंडिज खेळाडूंच्या चेहऱ्यावर दुःख दिसून येतंय.
टी-20 वर्ल्डकपमधून बाहेर पडली वेस्ट इंडिज
फिरकीपटू तबरेझ शम्सीच्या गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीमुळे दक्षिण आफ्रिकेने पावसाने व्यत्यय आणलेल्या या रोमहर्षक सामन्यात डकवर्थ लुईसच्या सिस्टीमने वेस्ट इंडिजचा तीन विकेट्स राखून पराभव केला. या विजयसह दक्षिण आफ्रिकेने टी-20 (icc t20) वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. या सामन्यातील पराभवामुळे सह-यजमान वेस्ट इंडिज स्पर्धेतून बाहेर पडली.
या सामन्यात शम्सीने 27 धावांत 3 विकेट्स घेतले. यावेळी केशव महाराजने त्याला साथ देत 24 रन्समध्ये 1 विकेट घेतली. याशिवाय कर्णधार एडन मार्कराम 28 रन्समध्ये 1 विकेट पटकावली. दक्षिण आफ्रिकेविरूद्ध वेस्ट इंडिजला 8 विकेट्सवर केवळ 135 धावा करता आल्या. वेस्ट इंडिजकडून रोस्टन चेसने सर्वाधिक 52 धावा केल्या.
याला प्रत्युत्तर म्हणून दक्षिण आफ्रिकेने 2 विकेट्स 15 रन्स केले. असं असताना पावसामुळे खेळ थांबवावा लागला. खेळ पुन्हा सुरू झाला तेव्हा डकवर्थ-लुईस पद्धतीचा वापर करून 17 ओव्हर्समध्ये 123 रन्स करण्याचं नवं लक्ष्य दक्षिण आफ्रिकेला देण्यात आले. दक्षिण आफ्रिकेने 16.1 ओव्हर्समध्ये सात विकेट गमावत 124 रन्स करत विजय मिळवला. यासोबत त्यांनी सुपर 8 मधील तिन्ही सामने जिंकले आणि ग्रुप 2 मध्ये अव्वल स्थान मिळवून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला.
हेही वाचा :
काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दाखविले काळे झेंडे
मी अजून दिशा बदलली नाही, पण लोकांनी…’ के पी. पाटलांनी विधानसभेला शड्डू ठोकला!
लग्न जुळत नसलेल्या व्यक्तींनी आजपासून ‘हा’ उपाय सुरू करा; महिन्याच्या आत आनंदाची बातमी मिळेल