मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती(political) सरकारचा शपथविधी आज नागपूरमध्ये पार पडणार आहे. त्याआधी सकाळपर्यंत संभाव्य मंत्र्यांची नावे जाहीर करण्यात आली नव्हती. अजूनही कोणत्याही पक्षाने मंत्र्यांची नावे अधिकृतरित्या जाहीर केलेली नसली तरी काही आमदारांनी त्यांना मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी फोन आल्याचं सांगितलं आहे. त्यात पश्चिम महाराष्ट्राला झुकतं माप दिल्याचं दिसत आहे. तीन जिल्ह्यांमधून तब्बल १० जणांना फोन गेला आहे. तर आणखी काही नावं पुढे येण्याची शक्यता आहे.
सोलापूर वगळता इतर चारही जिल्ह्यांचे प्रतिनिधी नव्या मंत्रिमंडळात दिसतील. सातारा, सांगली, पुणे व कोल्हापूरमधील अनेक आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे. कोल्हापूरमधून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांचं मंत्रिपद कायम राहण्याची शक्यता आहे.
तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून(political) प्रकाश आबिटकर यांना संधी दिली जाणार आहे. तर पुण्यातून तीन नेत्यांची मंत्रिपदी वर्णी लागणार आहे. यामध्ये भाजपचे चंद्रकांत पाटील व माधुरी मिसाळ तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून दत्ता भरणे यांना संधी जाणार आहे. त्यामुळे नव्या मंत्रिमंडळात पश्चिम महाराष्ट्राचा वरचष्मा पाहायला मिळू शकतो.
साताऱ्यात भाजपकडून शिवेंद्रराजे भोसले. अजित पवारांच्या पक्षाकडून मकरंद पाटील आणि जयकुमार गोरे या दोन आमदारांचा आज शपथविधी पार पडू शकतो. शिवसेनेच्या शिंदे गटाकडून पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांचं मंत्रिपद कायम ठेवण्यात आलं आहे. देसाई देखील आज मंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.
दरम्यान छगन भुजबळ, रवींद्र चव्हाण, दीपक केसरकर आणि सुधीर मुनगंटीवार या एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची तथा तिन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांची नावं फडणवीसांच्या मंत्रिमंडळ नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर, वर्ध्याचे भाजपाचे आमदार पंकज भोयर यांना संधी मिळणार आहे. यासह काही नव्या चेहऱ्यांना मंत्रीपदाची संधी मिळणार आहे. रवींद्र चव्हाण हे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून कामकाज पाहतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात ऐकायला मिळत आहे.
भाजपच्या या मंत्र्यांना मिळणार मंत्रिपद
- चंद्रशेखर बावनकुळे
२. आशिष शेलार
३. राधाकृष्ण विखे पाटील
४. पंकजा मुंडे
५. गिरीश महाजन
६. नितेश राणे
७. शिवेंद्रराजे भोसले
८. चंद्रकांत पाटील
९. पंकज भोयर
१०. मंगलप्रभात लोढा
११. जयकुमार रावल
१२. गणेश नाईक
१३. मेघना बोर्डीकर
१४. अतुल सावे
१५. जयकुमार गोरे
१६. माधुरी मिसाळ
१७. संजय सावकारे
१८. अशोक उईके
१९. आकाश फुंडकर
राष्ट्रवादीच्या या नेत्यांना मिळणार मंत्रिपद
१. धनंजय मुंडे
२. हसन मुश्रीफ
३. नरहरी झिरवाळ
४. आदिती तटकरे
५. बाबासाहेब पाटील
६. दत्तमामा भरणे
७. मकरंद पाटील
८. इंद्रनील नाईक
- माणिकराव कोकाटे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात(political) भाजपचे 21, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 12 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 10 मंत्री असणार आहेत. त्यापैकी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली आहे. त्यामुळे आता भाजपचे 20, शिवसेनेचे 11 तर राष्ट्रवादीचे 9 आमदार आज मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे. नागपूरच्या राजभवनात दुपारी तीननंतर शपथविधी होणार असून राजभवनाच्या प्रशस्त लॉनवर जोरदार तयारी सुरू आहे. 1991 मध्ये शिवसेनेतल्या फुटीनंतर नागपुरात शपथविधी झाला होता. त्यानंतर 33 वर्षांनी मंत्रिमंडळाचा शपथविधी नागपुरात होत आहे.
हेही वाचा :
भर बाजारात तरुणींचा जोरदार राडा; एकमेकींच्या झिंज्या उपटत हाणामारी, VIDEO व्हायरल
अल्लू अर्जूनला अटक केल्यानंतर देण्यात आली विशेष वागणूक; जेलमध्ये खाल्ला भात आणि करी
52 व्या वर्षात पदार्पण,पण…….., शहर हद्दवाढीच गिफ्ट नाही!