जे आमदार जगतापांना जमलं नाही ते, लंकेंनी करून दाखवलं…

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात आपल्या पक्षाचा खासदार (member) असावा, शरद पवार यांची ही इच्छा नीलेश लंके यांच्या रुपानं पूर्ण झाली. नीलेश लंके यांच्या रुपानं मिळालेल्या यशामुळं शरद पवार जाम खूश आहे. आमदार संग्राम जगताप यांना गेल्या पंचवार्षिकला 2019 मध्ये जे जमलं नाही, ते नीलेश लंके यांनी करून दाखवलं, अशी चर्चा शरद पवार यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ काबीज करण्याचे शरद पवार यांचे स्वप्न पुन्हा अधुरे राहते की, काय अशी चर्चा होती. परंतु नीलेश लंके यांना अजित पवार यांच्याकडून खेचून आणत शरद पवार यांनी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजपसमोर उभं केलं. नीलेश लंके यांनी विजय झाल्यानंतर आज शरद पवार यांची भेट घेत आशीर्वाद घेतले. नगर दक्षिणेतील विजयाचा आनंद नीलेश लंके यांच्यापेक्षा शरद पवार अधिक दिसत होता.

शरद पवार यांनी गेल्या पंचवार्षिकला 2019 मध्ये आमदार संग्राम जगताप यांना उमेदवारी दिली होती. शरद पवार यांनी त्यावेळी पाच सभा घेतल्या होत्या. आमदार जगताप यांचे वडील माजी आमदार अरुण जगताप यांनी विखेंवर केलेली टीका विशेष गाजली. त्यावेळी शरद पवार यांच्याबरोबर विखे परिवारातील डाॅ. अशोक विखे देखील त्यांच्याबरोबर होते. तरी देखील शरद पवार यांचे सीट येथे पडले.

भाजपचे सुजय विखे यांनी आमदार जगताप यांचा तब्बल 2 लाख 81 हजार 474 मतांनी पराभव केला. सुजय विखे यांना तब्बल 7 लाख 4 हजार 660 मते मिळाली होती तर, जगताप यांना 4 लाख 23 हजार 186 मतं मिळाली होती. या पराभवानंतर विधानसभेच्या निवडणुकीत संग्राम जगताप यांनी आपली आमदारकी राखली. शिवसेनेचे दिवंगत उपनेते अनिल राठोड यांचा त्यांनी पराभव केला.

सुजय विखे आणि संग्राम जगताप यांचे 2019 च्या निवडणुकीनंतर सुजय आणि संग्राम मैत्रीपर्व सुरू झालं. ही मैत्रीपर्व नगर शहराच्या विकासासाठी सुरू झाल्याचं दोन्हींकडून सांगण्यात आलं. या मैत्रीपर्वामुळे सुजय-संग्राम यांच्यातील 2019 मधील निवडणुकीच्या मैदानातील लढाईवर शंका देखील घेतली जाऊ लागली. यातून यावेळी शरद पवार अधिक सावध झाले. पक्ष फुटीनंतर आमदार जगताप यांनी अजित पवार यांची साथ केली.

हेही वाचा :

पहिल्याच पावसात मुंबई-गोवा महामार्गावर कोसळली दरड

रोहित शर्मा खेळला नाही तर कोण करणार टीम इंडियाच नेतृत्व?

‘आरक्षण दिलं नाही तर, एकही आमदार निवडून येणार नाही’; फडणवीसांच्या विधानानंतर जरांगेंचा इशारा