2 लाखांचं डाउन पेमेंट केल्यास Maruti Grand Vitara चा किती असेल EMI?

जर तुम्ही Maruti Grand Vitara च्या बेस व्हेरिएंटसाठी दोन लाख रुपयांचे(vitara) डाउन पेमेंट केले, तर मग तुमचा EMI किती असू शकतो त्याबद्दल आज आपण जाणून घेऊया.

आपली स्वतःची कार असावी हे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते. हेच स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी अनेक जण दिवसरात्र कष्ट करत असतात. अशातच जर तुम्ही मार्केटमध्ये एका उत्तम कारच्या शोधात(vitara) असाल तर मग Maruti Grand Vitara तुमच्यासाठी एक योग्य कार ठरू शकते.

मारुती सुझुकीने देशात अनेक उत्तम कार ऑफर केल्या आहेत. Maruti Grand Vitara ही त्यातीलच एक कार. ही एक मिड साइझ एसयूव्ही आहे, ज्याला मार्केटमध्ये चांगली मागणी मिळताना दिसत आहे.

भारतातील आघाडीच्या वाहन उत्पादनांपैकी एक असलेल्या मारुती सुझुकी, मध्यम आकाराच्या एसयूव्ही म्हणून मारुती ग्रँड विटारा ऑफर करत आहे. या एसयूव्हीचा बेस व्हेरिएंट म्हणून Sigma उपलब्ध करून देण्यात आली आहे. जर तुम्ही मारुती ग्रँड विटाराचा बेस व्हेरिएंट घरी आणण्याचा विचार करत असाल, तर 2 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केल्यानंतर, ही कार घरी आणण्यासाठी तुम्ही दरमहा किती EMI देऊ शकता? त्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.

Maruti Grand Vitara ची किंमत किती?
मारुती ग्रँड विटाराचा बेस व्हेरिएंट म्हणून Sigma ऑफर केली जाते.(vitara) कंपनी या मिड साइझ एसयूव्हीचा बेस व्हेरिएंट 11.42 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत विक्रीसाठी उपलब्ध करून देत आहे. जर ही कार दिल्लीमध्ये खरेदी केली तर 11.42 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीसह रजिस्ट्रेशन आणि विमा देखील भरावा लागेल. ही कार खरेदी करण्यासाठी तुम्हाला सुमारे 1.14 लाख रुपयांचा रजिस्ट्रेशन टॅक्स आणि सुमारे 55 हजार रुपयांचा विमा भरावा लागेल. यासोबतच, 11420 रुपयांचा टीसीएस शुल्क देखील भरावा लागेल. यानंतर, दिल्लीमध्ये कारची ऑन-रोड किंमत 13.26 लाख रुपये होईल.

दोन लाखांच्या डाउन पेमेंटनंतर किती असेल EMI?
जर तुम्ही मारुती ग्रँड विटाराचा बेस व्हेरिएंट, सिग्मा खरेदी केले तर बँक फक्त एक्स-शोरूम किमतीवर कर्ज देईल. अशा परिस्थितीत, 2 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केल्यानंतर, तुम्हाला बँकेकडून सुमारे 11.26 लाख रुपयांची रक्कम मिळवावी लागेल. जर बँक तुम्हाला 9 टक्के व्याजासह 7 वर्षांसाठी 11.26 लाख रुपये देत असेल, तर तुम्हाला पुढील सात वर्षांसाठी दरमहा फक्त 18123 रुपये ईएमआय भरावा लागेल.

महागात पडेल EMI वर कार घेणं
जर तुम्ही बँकेकडून 7 वर्षांसाठी 9% व्याजदराने 11.26 लाख रुपयांचे कार लोन घेतले तर तुम्हाला सात वर्षांसाठी दरमहा 18123 रुपये ईएमआय भरावा लागेल. अशा परिस्थितीत, 7 वर्षांत तुम्हाला मारुती ग्रँड विटाराच्या बेस व्हेरिएंट सिग्मासाठी सुमारे 3.95 लाख रुपये व्याज द्यावे लागेल. त्यानंतर तुमच्या कारची एक्स-शोरूम, ऑन रोड आणि व्याजासह एकूण किंमत सुमारे 17.22 लाख रुपये असेल.

हेही वाचा :

YouTube वर पैसे कमवणे आता अवघड! नियम बदलले, वाचा सविस्तर

घरात कडाक्याच भांडण झालं, नवऱ्याने रागारागात चौथ्या मजल्यावरुन उडी मारली; जागीच मृत्यू VIDEO VIRAL

शिवसेना पक्ष आणि चिन्हावर ‘या’ तारखेला सुप्रीम कोर्टात सुनावणी; महाराष्ट्राचे लक्ष या निर्णयाकडे