श्रावण महिन्यातील मासिक दुर्गाष्टमी कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा पद्धत

हिंदू धर्मामध्ये प्रत्येक व्रत आणि सणाला स्वतःचे विशेष महत्त्व आहे.(festival) श्रावण महिन्यात येणाऱ्या अष्टमी तिथीला मासिक दुर्गाष्टमी म्हणतात. या दिवशी दुर्गा देवीची पूजा केली जाते. मासिक दुर्गाष्टमी कधी आहे? जाणून घ्या

मासिक दुर्गाष्टमीचे व्रत दर महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला पाळले जाते.(festival) हे व्रत दुर्गा देवीला समर्पित आहे. या देवीची पूजा केल्याने जीवनात सुख आणि समृद्धी येते. मासिक दुर्गाष्टमीचे व्रत करणे खूप शुभ पाळले जाते. त्यामुळे व्यक्तीच्या घरामध्ये सकारात्मक येते आणि सर्व प्रकारची संकट दूर होतात, अशी मान्यता आहे.

श्रावण महिन्यातील मासिक दुर्गाष्टमीचे व्रत शुक्रवार, 1 ऑगस्ट रोजी पाळले जाणार आहे. यावेळी भक्त देवीची पूजा करुन उपवास देखील करतात. जाणून घ्या मासिक दुर्गाष्टमीचे व्रत कधी आहे, शुभ मुहूर्त

मासिक दुर्गाष्टमी शुभ मुहूर्त
श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी शुक्रवार, 1 ऑगस्ट रोजी सकाळी 4.58 वाजता सुरु होईल(festival) आणि या तिथीची समाप्ती शनिवार, 2 ऑगस्ट रोजी सकाळी 7.33 वाजता संपेल. निशा काळामध्ये देवीची पूजा केली जाईल. उद्यतिथीनुसार दुर्गाष्टमीचे व्रत शुक्रवार, 1 ऑगस्ट रोजी पाळले जाणार आहे.

बुधादित्य योगामुळे धनु राशीसह या राशीच्या लोकांना होईल फायदा, भगवान विष्णूंचा राहील आशीर्वाद
मासिक दुर्गाष्टमी शुभ योग
श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या अष्टमी तिथीलाच्या दिवशी शुभ योग देखील तयार होत आहे. या योगामध्ये शुभ कार्य केले जातात. या शुभ योगामध्ये देवीची पूजा केल्याने तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळते, अशी मान्यता आहे. यावेळी दुर्गाष्टमीच्या दिवशी भद्रावास तयार होत आहे. भद्रायोग संध्याकाळी 6.10 वाजेपर्यंत राहील. या काळात भद्रा पाताळ लोकात राहील. या योगात देवी दुर्गेची पूजा केल्याने भक्ताला इच्छित वरदान मिळेल.

मासिक दुर्गाष्टमी पूजा पद्धत
मासिक दुर्गाष्टमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ कपडे परिधान करावे.

घरातील देव्हारा स्वच्छ करुन घरामध्ये गंगाजल शिंपडून घ्या

त्यानंतर देवीची मूर्ती किंवा चित्र लावून पूजा करावी आणि देवीसमोर दिवा लावावा.

ऑगस्ट महिन्यात अनेक मोठ्या ग्रहांचे होणार संक्रमण, या राशीच्या लोकांना होणार आर्थिक लाभ
देवीला लाल वस्त्र, लाल फुले, सिंदूर, कुंकू, तांदळाचे दाणे, बांगड्या आणि श्रृंगाराच्या वस्तू अर्पण करा.

पूजा झाल्य़ानंतर देवीला फळे, मिठाई, पंचामृत किंवा तुमच्या आवडीचा कोणत्याही गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवा.

या दिवशी दुर्गा चालिसा, दुर्गा सप्तशती किंवा “ओम दूं दुर्गाय नमः” या मंत्राचा जप करा

त्यानंतर देवीची आरती करुन पूजेची समाप्ती करावी.

दुर्गाष्टमी व्रताचे महत्त्व
दुर्गा अष्टमीच्या दिवशी उपवास करण्याला विशेष महत्त्व आहे. यावेळी भक्त फक्त एकच जेवण खातात किंवा फळे खातात. त्याचसोबत संपूर्ण विधींसह उपवास पूर्ण केल्याने लोकांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. दुर्गाष्टमीच्या दिवशी गरजूंना अन्न, कपडे किंवा इतर आवश्यक वस्तूंचे दान करणे देखील शुभ मानले जाते.

हेही वाचा :

मोदींना भाजपची गरज नाही! खासदार निशिकांत दुबेंचं स्फोटक विधान

सांडपाणी गटारी साठी स्वामी मळा परिसरात नागरिक बसणार उपोषणाला* .

महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या खात्यावर पाचवा हप्ता जमा; 5 कोटी 73 लाखांहून अधिक रक्कमेचा आर्थिक दिलासा