शेतकऱ्यांना पीएम किसानचा ₹2000 चा हप्ता कधी मिळणार? तारीख आली समोर?

देशातल्या कोट्यवधी शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबवली जाते. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना ठराविक कालावधीनंतर आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. (farmers) आता शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या २४ व्या हप्त्याची वाट पाहतायेत.

पीएम किसान योजनेअंतर्गत आतापर्यंत एकूण २३ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. उपलब्ध माहितीनुसार, जून महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २३ वा जाहीर करण्यात आला होता. या हप्त्याचा लाभ सुमारे ९ कोटींपेक्षा अधिक पात्र शेतकऱ्यांना मिळाला.

पीएम किसान योजनेचा हप्ता साधारणपणे चार महिन्यांच्या अंतराने जारी केला जातो. २३ वा हप्ता जूनमध्ये मिळाल्यामुळे चार महिन्यांनंतर कालावधी ऑक्टोबरमध्ये पूर्ण होतो. त्यामुळे २४ वा हप्ता ऑक्टोबरमध्ये जारी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र २४ व्या हप्त्याची निश्चित तारीख केंद्र सरकारकडून अद्याप अधिकृतपणे जाहीर झालेली नाही. (farmers) त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिकृत घोषणेची प्रतीक्षा करणं आवश्यक आहे.

पीएम किसान योजनेतल्या आर्थिक मदतीची रक्कम (DBT) प्रणालीद्वारे लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पाठवली जाते. (farmers) त्यामुळे या प्रक्रियेत बँकेत फेऱ्या मारण्याची गरज राहत नाही आणि पात्र लाभार्थ्यांना सरकारकडून पाठवलेली रक्कम थेट मिळते. शेतकऱ्यांनी हप्ता मिळण्याआधी आपली पात्रता बँक खातं आणि योजनेशी संबंधित आवश्यक तपशील अपडेट आहे की नाही, हे तपासून ठेवणं फायदेशीर ठरू शकतं. २४ व्या हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर झाल्यानंतर त्याबद्दलची माहिती स्पष्ट होईल.

हेही वाचा :

एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते, पण बड्या नेत्याच्या गौप्यस्फोटाने राजकारणात खळबळ?

 सूर्य स्वराशीत करणार प्रवेश, मेष-मकरसह या ५ राशींचे भाग्य उजळणार?

सांगली जिल्ह्यात बिबट्याची दहशत कायम?