बिग बॉस लोगो देखील बदलण्यात आला आहे आणि या सीझनचा पहिला प्रोमो(promo) देखील प्रदर्शित करण्यात आला होता. आता या नव्या सीजनमध्ये कोणते नवे स्पर्धक असणार याकडे आता प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

बिग बाॅस १९ चा नवा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे.
बिग बाॅस १९ च्या घरामध्ये सेलिब्रेटी शेफ शोचा विजेता गौरव खन्ना(promo) हा सामील होणार अशी अटकळ बांधली जात आहे.
सलमान खान हा बिग बाॅस १९ चा नवा सिझन होस्ट करणार की नाही?
Bigg Boss 19 Update : भारतीयांचा आणि घराघरात चालणारा वादग्रस्त शो बिग बॉस आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सलमान खानचा टेलिव्हिजन वरचा लोकप्रिय शो बिग बॉसचा नवा सीजन 19 वा हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बिग बॉस या नव्या सीझनमध्ये नव्या अवतारामध्ये पाहायला मिळणार आहे. कारण बिग बॉस लोगो देखील बदलण्यात आला आहे आणि या सीझनचा पहिला प्रोमो देखील प्रदर्शित करण्यात आला होता. आता या नव्या सीजनमध्ये कोणते नवे स्पर्धक असणार याकडे आता प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. मागील अनेक सीझनमध्ये टेलिव्हिजनवर राज्य करणारा हा शो भारतीयांच्या त्याचबरोबर परदेशामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाहिला जातो.
यावेळी अनेक वादग्रस्त सेलिब्रेटी या घरांमध्ये सहभागी होणार आहेत अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.(promo) अनेक वृत्तांच्या माहितीनुसार असे म्हटले जात आहे की आत्तापर्यंत पाच स्पर्धक हे फायनल झाले आहेत. हे स्पर्धक आता घरामध्ये एन्ट्री करणार असे म्हटले जात आहे. यामध्ये पहिले नाव हे सोशल मीडिया स्टार फैजू शेख हा बिग बॉसच्या नव्या सीझनमध्ये पाहायला मिळणार आहे. यासंदर्भात अजूनपर्यंत बिग बॉस टीमने किंवा कलर्सने कोणतीही माहिती शेअर केलेली नाही. त्यानंतर दुसरी स्पर्धक ही भारताचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल यांची माजी पत्नी धनश्री वर्मा ही बिग बॉस 19 च्या घरात दिसणार अशा चर्चा सध्या सुरू आहेत.
‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’ च्या नव्या पर्वात परतणार मंदिरा बेदी? साकारणार खास भूमिका
टेलिव्हिजनवरचा स्टार अभिनेता गौरव खन्ना याने नुकताच सोनीवर झालेला सेलिब्रिटी शेफ हा शो जिंकला आहे. आता तो लवकरच बिग बॉस 19 च्या घरामध्ये दिसणार आहे अशी अटकळ बांधली जात आहे. नुकताच प्राईम व्हिडिओवर झालेला ट्रेडर्स या शोमध्ये झळकलेली अभिनेत्री अपूर्वा मक्खीजा ही आता बिग बॉसच्या नव्या सीझनमध्ये पाहायला मिळणार असा अंदाज लावला जात आहे त्या संदर्भात कोणतीही माहिती आत्तापर्यंत अभिनेत्रीने त्याचबरोबर कोणत्याही बिग बॉसचा टीमने दिलेली नाही. तर पाचवा बिग बॉस 19 च्या घरामध्ये जाणारी पुढची स्पर्धक आहे. हैदराबादची खाला म्हणून ओळखली जाणारी प्रिया रेड्डी ही बिग बॉसच्या घरामध्ये जाणार अशी अटकळ बांधली जात आहे.
बिग बॉस चा शो हा ऑगस्टमध्ये सुरू होणार अशी चर्चा सुरू झाली आहे यासंदर्भात अजून पर्यंत तारीख रिव्हिल झालेली नाही. बिग बॉस 19 साठी स्पर्धक फारच उत्सुक आहेत. बिग बॉस 18 नंतर बराच वेळ कोणताही रियालिटी शो हा आला नव्हता बिग बॉस ओटीटी देखील यावेळी चालवण्यात आला नाही त्याचबरोबर बिग बॉस मराठी देखील अजून पर्यंत सुरू झालेला नाही त्यामुळे बिग बॉस 19 साठी स्पर्धका फारच उत्सुक आहेत आणि कोणते नवे स्पर्धक येणाऱ्या संदर्भात आम्ही तुम्हाला वेळोवेळी माहिती देणार आहोत.
हेही वाचा :
मोदींना भाजपची गरज नाही! खासदार निशिकांत दुबेंचं स्फोटक विधान
सांडपाणी गटारी साठी स्वामी मळा परिसरात नागरिक बसणार उपोषणाला* .