नाशिक: प्रवास करताना सतर्कता राखण्याची गरज वारंवार अधोरेखित(train line) केली जाते, परंतु घाईगडबडीत असलेल्या प्रवाशांनी अनेकदा आपला जीव गमावला आहे. सध्या सोशल मीडियावर नाशिक रेल्वे स्थानकातील असाच एक व्हायरल व्हिडिओ लोकांच्या चर्चेचा विषय बनला आहे, ज्यामध्ये धावत्या ट्रेनमधून पडणाऱ्या दोन महिलांसह चार वर्षाच्या बाळाला पोलिसांनी वाचवले आहे.
ही घटना नाशिक रेल्वे(train line) स्थानकावर घडली. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसते की एक महिला लहान बाळासह धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होती. परंतु, तिचा तोल गेल्यामुळे ती आणि तिच्यासोबतची दुसरी महिला ट्रेनमधून खाली पडल्या. मात्र, तिथे असलेल्या सतर्क पोलिसांच्या वेळीच केलेल्या प्रयत्नांमुळे दोन्ही महिला आणि बाळ सुरक्षित राहिले.
सदर व्हिडिओ सोशल मीडियावर @saamtvnews या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओनंतर नेटकऱ्यांनी पोलिसांचे कौतुक केले असून, एका युजरने लिहिले, ‘त्या पोलिसांचे करावे तेवढे कौतूक कमी आहे.’ तर काहींनी महिलांच्या निष्काळजीपणावर संताप व्यक्त केला आहे.
हा व्हिडिओ आपल्या देशातील रेल्वे प्रवासातील धोक्यांची जाणीव करून देतो आणि प्रवाशांनी सतर्क राहण्याची गरज अधोरेखित करतो. या घटनेमुळे रेल्वे स्थानकांवरील सुरक्षा आणि सतर्कतेच्या नियमांचे पालन करण्याची आवश्यकता अधिकच महत्त्वाची ठरते.
हेही वाचा :
भाजपच्या बैठकीत अजित पवार गट- शिंदे गटाबाबत नेत्यांच्या मनातील खदखद बाहेर
आधी सोबत दारू प्यायली, नंतर मित्रानेच मित्रावर चाकूने भोसकले अन्…
‘स्टायपेंडची भीक नको; हक्काच्या नोकऱ्या द्या; कर्नाटकात झाले ते महाराष्ट्रात घडेल का?