अजगराचे चुंबन घेत होती तितक्यात सापाने नाकावरच केला वार, रशियन डांसरचा Video Viral

आजच्या युगात सोशल मीडियावर रोज काहीतरी नवीन पाहायला मिळतं. प्रत्येक धोकादायक वस्तू आणि प्राण्यासोबत स्टंट करण्याचा आणि त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्याचा ट्रेंड आहे. एका महिलेचा सापासोबत फोटोशूट करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. साप(snake) हा धोकादायक प्राण्यांपैकी एक आहे. तो कधी आणि कोणावर हल्ला करेल हे सांगता येत नाही.

मात्र, पाळीव सापांचे(snake) विष काढले जाते. तरीही ते इतके आक्रमक आहेत की ते त्यांच्या हल्ल्याने कुणालाही गंभीर इजा होऊ शकते. जरी ते विषारी नसले तरी त्यांचा वार आपल्याला चांगलाच महागात पडू शकतो. अशात सापाशी चुकूनही कधी पंगा घेऊ नये नाहीतर आपले काय होईल ते सांगता येत नाही.

सध्या असाच काहीसा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे दिसून आले आहे ज्यात एक महिला एका भल्यामोठ्या अजगाराशी मस्ती करताना दिसून आली. मात्र काही क्षणातच तिची ही मस्ती तिच्या अंगलढ आली.

अजगाराशी मस्ती करणं तरुणीला चांगलच महागात पडलं. अजगराने तरुणीवर केलेला हा थरारक वार आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून लोक यातील दृश्ये पाहून अचंबित होत आहेत. व्हिडिओत नक्की काय घडले ते जाणून घेऊयात.

व्हायरल व्हिडिओमध्ये उपस्थित असलेली महिला रशियन डान्सर आहे. ती निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये अजगरसोबत पोज देताना दिसत आहे. अजगराला हातात धरून तीही कॅमेराकडे पाहते. यानंतर, सापाला हाताळताना, ती त्याच्या दिशेने ओठांचा चंबू (पाऊट) करत फोटो क्लिक करण्यासाठी पोज देते.

मात्र पुढच्याच क्षणी अजगर हवेच्या वेगात तिच्या नाकावर हल्ला करत जोरदार दंश करतो. यानंतर ती सापाला(snake) जमिनीवर सोडताना दिसते. यानंतर काय घडले हे तरुणीने आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तिच्या नाकाचा भाग दाखवला आहे. यात तिच्या नाकावर अजगराने चावल्याचे मार्क दिसत आहेत.

दरम्यान या घटनेचा व्हिडिओ @shhkodalera तरुणीने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. व्हिडिओला 1 मिलियनहुन अधिकचे व्युज मिळाले आहेत. तसेच अनेकांनी व्हिडिओवर कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया देखील व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “तुम्ही अजून काय अपेक्षा करत होता” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “पाहूनच मला भीती वाटली”.

हेही वाचा :

सस्पेन्स स्टोरी सैफ अलि ची शंका, संशय घेण्यास कारण की!

शासन सहभागाने सांगलीत ज्यूदो खेळाचं निपुणता केंद्र उभारणार; मंत्री चंद्रकांत पाटील

माजी क्रिकेटपटूने एमएस धोनीवर केले गंभीर आरोप, म्हणाला – मला यामुळेच निवृत्ती घ्यायची…