भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात आहे. यातील तिसऱ्या टेस्ट सामन्याला गुरुवारपासून लॉर्ड्स मैदानावर सुरुवात झाली. शुक्रवारी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताचा गोलंदाज जसप्रीत बुमराह याने इंग्लंडच्या विकेट घेतल्या आणि 387 धावांवर इंग्लंडला ऑल आउट केले.

दुसऱ्या दिवशीचा खेळ संपल्यावर बुमराह मीडियासोबत बोलण्यासाठी पत्रकार परिषदेत आला. त्यावेळी पत्रकार परिषद सुरु असताना एका पत्रकाराचा फोन वाजला. हा फोन पत्रकाराच्या पत्नीचा होता. त्यावेळी बुमराहने कशी प्रतिक्रिया दिली या घटनेचा व्हिडीओ(Video) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह केवळ मैदानात विरोधी संघाच्या विजेट घेत नाही तर विनोद करण्यातही माहिर आहे. लॉर्ड्स मधील टेस्टच्या दुसऱ्या दिवशी मीडियाशी बोलताना त्याने जे के ते आश्चर्यकारक होते. जसप्रीत बुमराहचं हे बोलणं कॅमेर्यामध्ये रेकॉर्ड झालं ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
लॉर्ड्सवरील पहिल्या इनिंगमध्ये 5 विकेट घेतल्यावर जसप्रीत बुमराह पत्रकार परिषदेत गेला. येथे तो पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तर देत असताना टेबलवर एका पत्रकाराचा फोन वाजला. त्यावर आलेला फोन हा पत्रकाराच्या पत्नीचा होता. बुमराहने तो फोन उचलून बाजूला ठेवला, पण या दरम्यान तो त्याला विचारलेला प्रश्न सुद्धा विसरला. त्याने फोन बाजूला ठेवल्यावर पत्रकारांना म्हंटले की, ‘तुम्ही काय विचारलं परत सांगा मी विसरलो’.
लॉर्ड्स टेस्ट सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी पहिल्या दिवशी भारताला इंग्लंडच्या 4 विकेट घेणं शक्य झालं, तर दिवसाअंती इंग्लंडचा स्कोअर 251 धावा होता. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाकडून गोलंदाज बुमराहने ४ विकेट घेतल्या तर मोहम्मद सिराजला १ विकेट मिळाली. त्यामुळे इंग्लंडला 387 धावांवर ऑल आउट करणं शक्य झालं. त्यानंतर टीम इंडियाची फलंदाजी सुरु झाली, मात्र भारताने दिवसाअंती ३ विकेट गमावून 145 धावा केल्या.
हेही वाचा :
‘घाबरली होती बेबो’, सैफ अली खाननंतर करीना कपूरवर झाला होता अटॅक,
प्रेमी जोडप्याला जनावरांसारखी वागणूक, गावकऱ्यांनी जे केलं ते अंगावर काटा आणणारं
कॉंग्रेसचा पश्चिम महाराष्ट्रातील माजी आमदार भाजपच्या गळाला; प्रवेशाचा मुहुर्तही ठरला