वाढदिवसाच्या पार्टीमधून अचानक पत्नीचा हात सोडून अरबाज खान कोणाकडे गेला? Viral होतोय व्हिडीओ

अरबाज खानच्या वाढदिवसानिमित्त रविवारी झालेल्या सेलिब्रेशनला अनेक बॉलिवूड(Bollywood) स्टार्सनी हजेरी लावली. या पार्टीतील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अरबाज आपल्या पत्नीचा हात सोडून दुसरीकडे जाताना दिसतो. पाहूया, नेमकं काय घडलं या व्हिडीओमध्ये. बॉलिवूड अभिनेता आणि निर्माता अरबाज खान आज, 4 ऑगस्ट रोजी आपला 58 वा वाढदिवस साजरा करत आहे.

या खास दिवशी त्याच्या वाढदिवस सेलिब्रेशनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली असून सर्वत्र याचीच चर्चा आहे.व्हायरल व्हिडीओमध्ये अरबाज खान त्याची पत्नी शूरा खानसोबत दिसतो(Bollywood). पापाराझी आणि चाहत्यांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा मिळताच शूरा त्याचा हात हळूवारपणे सोडते आणि त्याला हा क्षण चाहत्यांसोबत एन्जॉय करण्यास सांगते.

यानंतर अरबाज चाहत्यांशी हसतमुखाने संवाद साधताना आणि फोटोसाठी पोझ देताना दिसतो. त्याची सहजता आणि पत्नीचा सपोर्ट पाहून चाहत्यांनी त्यांचे कौतुक केले आहे. ती मागे राहून आनंदाने आप्लया पतीचा आनंद पाहून खूश होताना दिसत आहे.

हा व्हिडीओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले, ‘ही खरी स्त्री आहे जी आपल्या नवऱ्याचा सन्मान करते.’ तर दुसऱ्याने लिहिले, ‘अरबाजची पत्नी मागे उभी राहून खूप आनंदी दिसते, खऱ्या नात्याची हीच खूण आहे.’ काहींनी तर शूरा खानला ‘अरबाजचे खरे प्रेम’ असेही संबोधले. याशिवाय अनेकांनी अरबाजला थेट वाढदिवसाच्या शुभेच्छा देत, ‘नेहमी असाच हसतमुख राहा’ अशा कमेंट्स केल्या आहेत.

या व्हिडीओमुळे अरबाज आणि शूराच्या बॉन्डिंगची चर्चा सर्वत्र रंगली आहे. काही चाहत्यांनी या व्हिडीओला ‘कपल गोल्स’ असेही म्हटले आहे. अनेकांना त्यांच्या नात्याची सहजता आणि परस्परांचा आदर भावला आहे.कामाच्या आघाडीवर बोलायचे झाल्यास, अरबाज खान सध्या ‘दबंग 4’ या चित्रपटाच्या निर्मितीत व्यस्त असून या चित्रपटात तो माखनचंद पांडे या व्यक्तिरेखेची भूमिका साकारू शकतो अशी चर्चा आहे.याआधी त्याने ‘डर’, ‘हॅलो ब्रदर’, ‘प्यार किया तो डरना क्या’, ‘अली बाबा’ अशा अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये उत्कृष्ट भूमिका केल्या आहेत. त्याच्या चाहत्यांना आता दबंग 4 मधील त्याच्या नव्या लूकची उत्सुकता लागली आहे.

हेही वाचा :

विराटसोबतच्या अफेअरचा विषय निघताच तमन्नानं सगळं सांगितलं… लग्नाबद्दल म्हणाली…
संतापजनक! शाळेत जात असतांना बळजबरीने गाडीत बसवलं, विनयभंग केला, पाईपने मारहाण केली
या शेतकऱ्यांना २००० नव्हे तर ७००० मिळाले; तुम्हाला आले का? वाचा सविस्तर