राज्यातील तिसरी आघाडी कुणावर “प्रहार” करणार ?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : नोव्हेंबर महिन्यात होऊ घातलेल्या महाराष्ट्राच्या विधानसभा(assembly) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि सत्ताधारी महायुतीला पर्याय म्हणून राज्यात तिसरी आघाडी स्थापन करण्यात आली आहे. याबद्दलची अधिकृत घोषणा गुरुवारी पुणे येथे राज्य संघटनेचे संभाजी राजे छत्रपती, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांनी संयुक्तपणे केली आहे.

सर्वसामान्य मतदारांच्या समोर तिसरा पर्याय ठेवण्याचा महाराष्ट्रातील हा काही पहिला प्रयोग नव्हे. यापूर्वीही डाव्यांनी एकत्र येऊन तिसरी आघाडी स्थापन केली होती पण मतदारांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही अर्थात तेव्हाच्या आणि आत्ताच्या महाराष्ट्रातील राजकारणात खूप फरक आहे.

एक काळ असा होता की काही अपवाद वगळले तर महाराष्ट्रात फक्त आणि फक्त काँग्रेस पक्ष(assembly) सत्तेत होता. शेतकरी कामगार पक्ष हा तेव्हा मतदारांच्या समोर समर्थ पर्याय होता पण हा पर्याय मतदारांनी स्वीकारला नाही. नंतर काही वर्षांनी विरोधी पक्षांना एकत्र करून शरद पवार यांनी” पुलोद “चा प्रयोग केला होता. पण हा त्यांचा प्रयोग अडीच वर्षात फसला.

त्यानंतरही भाकप, माकप, समाजवादी पक्ष, आर पी आय, शेतकरी कामगार पक्ष यांनी एकत्र येऊन तिसरी आघाडी स्थापन केली होती. पण या आघाडीला प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर विसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकात शिवसेना आणि भाजप युतीला मतदारांनी समर्थ पर्याय म्हणून चांगला प्रतिसाद दिला. अपक्ष आमदार हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखालील 18 अपक्ष आमदारांचा पाठिंबा घेऊन तेव्हा युती सरकार आले. शिवसेनेचे मनोहर पंत जोशी हे मुख्यमंत्री बनले. त्यानंतर 2014 पर्यंत काँग्रेस आघाडीचे सरकार होते आणि शिवसेना भाजप हा आघाडी समोर पर्याय होता. नंतरचा राजकीय इतिहास सर्वांनाच ज्ञात आहे.

2019 मध्ये बारा बलुतेदारांच्या संघटनांना प्रकाश आंबेडकर यांनी एकत्र आणले आणि वंचित चा पर्याय मतदारांसमोर ठेवला. हा त्यांचा प्रयत्नही फसला पण लोकसभा निवडणुकीत वंचित चा फायदा अप्रत्यक्षपणे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला झाला. तर असा आजपर्यंतचा तिसऱ्या आघाडीचा इतिहास आहे. हे पर्याय फार काळ टिकले नाहीत. केंद्रात सत्तेवर ठाण मांडून बसलेल्या काँग्रेसला पराभूत करण्यासाठी तिसऱ्या आघाडीचे प्रयत्न झाले आहेत.

एक दोन वेळा तर निवडणुकांना सामोरे जाण्याच्या आधीच तिसऱ्या आघाडीचा प्रयोग कोसळला होता.आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा तिसरी आघाडी स्थापन झाली आहे. या आघाडीत वंचितला येण्याचे आवाहन करण्यात आले आहे पण प्रकाश आंबेडकर यांचे एकूण राजकारण पाहता त्यांची वंचित आघाडी तिसऱ्या आघाडीत जाईल असे वाटत नाही.

माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी दोन वर्षांपूर्वी”स्वराज्य”संघटनेची स्थापना केली आणि त्यानंतर राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीला पर्याय म्हणून तिसरी आघाडी स्थापन करण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू होते. लोकसभा निवडणुकीत त्यांनी हे प्रयत्न थांबवले होते कारण त्यांचे पिताश्री छत्रपती शाहू महाराज हे महाविकास आघाडी कडून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत होते.

लोकसभा निवडणुका झाल्यानंतर विधानसभेच्या(assembly) सार्वत्रिक निवडणुका समोर ठेवून आता तिसरी आघाडी ही मतदारांच्या समोर पर्यायी म्हणून आलेली आहे. संभाजी राजे छत्रपती हे अप्रत्यक्षपणे महाविकास आघाडीतील ठाकरे गटाच्या संपर्कात राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने होते. राजू शेट्टी यांनाही लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा बिनशर्त पाठिंबा हवा होता आणि प्रहार संघटनेचे बच्चू कडू हे तर महाविकास आघाडीत राज्यमंत्री होते. म्हणजे तिसऱ्या आघाडीचे हे तिन्ही संस्थापक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे महाविकास आघाडीच्या संपर्कात राहिले आहेत. आता त्यांनी अधिकृतपणे महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतंत्र भूमिका घेऊन तिसरी आघाडी स्थापन केली आहे.

संभाजी राजे छत्रपती यांची मराठा समाजाचे नेते म्हणून मराठवाडा वगैरे परिसरात ओळख निर्माण झालेली आहे. स्वराज्य संघटनेची बांधणीही त्यांनी तिथे केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांची महाराष्ट्राच्या शुगर बेल्ट मध्ये ताकद आहे तर बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचे मराठवाडा विदर्भ परिसरात प्राबल्य आहे. तिसऱ्या आघाडीची ताकद वाढवण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनाही या नेत्यांनी आजमावून पाहिलेले आहे, पण प्रतिसाद नाही.

एकूणच तिघा मातब्बर नेत्यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या तिसऱ्या आघाडीचा प्रयोग कितपत यशस्वी होतो हे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे. या तिसऱ्या आघाडीचा फटका महाविकास आघाडीला की महायुतीला बसणार हे सुद्धा निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. आणि त्याबरोबरच तिसऱ्या आघाडीचे उपद्रव मूल्यसुद्धा सिद्ध होणार आहे.

हेही वाचा:

निकी तांबोळी स्टाइल ‘बाईssss…’ म्हणत सुषमा अंधारेंचा भाजपावर निशाणा

महायुती आणि मविआला टक्कर देण्यासाठी महाराष्ट्रात तिसरी आघाडी तयार

पोलीस ठाण्यात आर्मी ऑफिसरच्या होणाऱ्या पत्नीची मध्यरात्री अधिकाऱ्याने अंतर्वस्त्रे काढली अन्…