आयपीएल 2024 मध्ये प्ले ऑफमध्ये सध्या 2 जागा रिक्त आहेत(team), ज्यासाठी 5 संघांमध्ये चुरस पाहायला मिळत आहे. कोलकाता नाइट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स आधीच पात्र झाले आहेत. चेन्नई सुपर किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, सनरायझर्स हैदराबाद, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स अजूनही स्पर्धेत आहेत. याचदरम्यान ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मॅथ्यू हेडनने यंदा आयपीएलमध्ये जेतेपद पटकावणाऱ्या संघाचं नाव जाहीर केलं आहे.
यंदाची आयपीएल राजस्थान रॉयल्स जिंकेल(team)असं मला वाटतं. या हंगामात राजस्थान संघाचा परफॉर्मन्स उत्तम आहे. त्यामुळे हा हंगाम जिंकण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे, असं हेडनने सांगितलं, स्टार स्पोर्ट्सच्या एका शो मध्ये हेडनने यंदाची आयपीएल कोणती टीम जिंकेल याबाबत त्याने आपली भविष्यवाणी केली. राजस्थान रॉयल्सचा अनुभवी खेळाडू जोस बटलर सध्या इंग्लंडला परतला आहे. महत्त्वाच्या मॅचेसमधील त्याची अनुपस्थिती राजस्थान रॉयल्सच्या संघाला चांगलीच जाणवू शकते
कर्णधार सॅम करनच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर पंजाबने राजस्थानचा पाच विकेटने पराभव केला. राजस्थानने दिलेले 145 धावांचे आव्हान पंजाबने पाच विकेटच्या मोबदल्यात सहज पार केले. पंजाबकडून कर्णधार सॅम करन यानं नाबाद 63 धावांची खेळी केली. पंजाबनं या विजयासह गुणतालिकेत नवव्या स्थान मिळवले. मुंबई इंडियन्स दहाव्या क्रमांकावर घसरला आहे. संजू सॅमसन याचा राजस्थान रॉयल्सचं प्लेऑफमधील स्थान निश्चित झालेय. पण त्यांना लागोपाठ चौथ्या पराभवाचा सामना करावा लागलाय. राजस्थानच्या फलंदाजांकडून लौकिकास साजेशी कामगिरी झालेली नाही. प्लेऑफआधी राजस्थानच्या संघासाठी ही चिंतेची बाब ठरली आहे. राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना रियान परागच्या 48 धावांच्या मोबदल्यात 144 धावांपर्यंत मजल मारली होती. पंजाबने हे माफक आव्हान पाच विकेटच्या मोबदल्यात सहज पार केले.
कोलकाताने 19 तर राजस्थानने 16 गुणांसह प्लेऑफमध्ये प्रवेश केलाय. त्यांचं स्थान आता निश्चित झालेय. आता फक्त दोन जागांसाठी स्पर्धा रंगणार आहे. यामध्ये चेन्नई सुपर किंग्स, सनरायजर्स हैदराबाद, आरसीबी, दिल्ली आणि लखनौ या संघामध्ये चुरस आहे. यामध्ये दिल्ली आणि लखनौ यांचं स्पर्धेतील आव्हान रामभरोसेच आहे. त्यामुळे दोन जागांसाठी खरी लढत तीन संघामध्येच होणार आहे. पण स्पर्धेतील आव्हान संपलेले संघ अनेकांची पार्टी खराब करु शकतात.
हेही वाचा :
शिवरायांचा अवमान करणाऱ्यांना गुडघे टेकायला लावणार!
संविधान बदलण्याच्या भूमिकेवर मोदी गप्प का? मल्लिकार्जुन खरगे यांचा सवाल
आरटीई प्रवेश प्रक्रिया उद्यापासून, नोंदणी अर्ज नव्याने करावा लागणार