पपई न्यूजपेपरमध्ये गुंडाळून का विकली जाते? 99% लोकांना उत्तर माहितीच नसेल

तुम्ही बाजारात पाहिलं असेलच की अनेकदा फळविक्रेत्यांकडे विक्रीसाठी (newspaper)असलेले पपई वर्तमानपत्रात गुंडाळून ठेवलेले असतात. तुम्हाला या मागचं कारण माहितीये का? तर आज या लेखाच्या माध्यमातून कारण जाणून घेऊयात. पपई हे आरोग्यासाठी खूप गुणकारी फळ आहे. प्रत्येक मोसमात हे फळ येते. त्यामुळं बाराही महिने हे फळ विक्रीसाठी असते. खरंतर वर्तमानपत्रात पपई गुंडाळून ठेवण्यामागे एक वैज्ञानिक कारण आहे. जाणून घेऊयात त्याचे कारण

एथिलीन गॅस
अनेक फळांप्रमाणेच पपईतून देखील अॅथिलीन नावाचा नैसर्गिक गॅस बाहेर पडतो. या गॅसमुळं पपई पिकण्यात महत्त्वाची भूमिका निभावते. हा गॅस एंडाइमांना टिगर करते. vजे स्टार्चला शुगरमध्ये ब्रेक करते. त्यामुळं फळ नरम होतात आणि चव वाढवते.जेव्हा पपई कागदात गुंडाळून ठेवण्यात येतेय तेव्हा फळातून निघणाऱ्या एथिलीन गॅस बंद ठिकाणी फसली जाते आणि एथिलीनचहे रासायनिक रिअॅक्शन पपई पिकण्याची पक्रिया वेगावे करते.

प्लास्टिकच्या ऐवजी कागदाचा वापर करणे अधिक गरजेचे आहे. कारण कागद एअर एक्सचेंज करण्याची प्रक्रिया अधिक सोप्पी होते. त्यामुळं अधिक पिकण्याची प्रक्रिया मंदावते. तर दुसरीकडे प्लास्टिक पपईची आद्रता लॉक करुन ठेवते. त्यामुळं पपई जास्त पिकते आणि बुरशी येण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळं पपई पिकवण्यासाठी वर्तमानपत्राचा वापर केला जातो.

पपई खाल्याने आपली प्रतिकारशक्ती मजबूत होते. हिवाळ्यात तुमची प्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर तुम्ही पपईचे फळ खाऊ शकता. तुमच्या डाएटमध्ये पपईचा समावेश करा,(newspaper) ज्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढेल. पपई हे व्हिटॅमिन सी आणि अनेक अँटिऑक्सिडंटने समृद्ध फळ आहे. याचे सेवन केल्याने तुम्ही अनेक व्हायरल इन्फेक्शन्सपासूनही बचाव करू शकता. पपई ही पचनासाठी प्रभावी आहे. हिवाळ्यात, बहुतेक लोकांना पचनाशी संबंधित समस्या उद्भवू लागतात. अशा परिस्थितीत आपण विविध उपाय करत असतो. पण पपई तुमची पचनशक्ती सुधारण्यासाठी प्रभावी आहे. वास्तविक, पपईमध्ये असलेले फायबर पचनासाठी खूप फायदेशीर मानले जाते. म्हणूनच जे लोक पचनाच्या समस्येने त्रस्त आहेत, ते पपईचे सेवन करु शकतात.

हेही वाचा :

वैष्णवी हगवणे प्रकरण भोवले! रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र

डोनाल्ड ट्रम्पचे ‘Air Force One’ जगात भारी; राजेशाही थाट पाहून तुमचेही डोळे दीपतील

हॉटेलमधून चेक आउट करताना रुममधील ‘या’ 5 वस्तू घरी घेऊन जाऊ शकता