सामंथा पापाराझींवर का भडकली? पाहा व्हायरल VIDEO viral

साऊथ सुपरस्टार समांथा रुथ प्रभू कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.(paparazzi) तिने आजवर अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे. तिच्या अभिनयाचे चाहते दिवाने आहेत. अशात आता तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये समांथा रुथ प्रभू पापाराझींवर भडकताना दिसत आहे. नेमकं घडलं काय, जाणून घेऊयात.

नुकतीतच समांथा रुथ प्रभू मुंबईत वांद्रे येथे जिमच्या बाहेर स्पॉट झाली. तेव्हा पापाराझी तिचे फोटो घेत होते. तिला ‘गुड मॉर्निंग’ बोलून शुभेच्छा देत होते. मात्र तेव्हा समांथा पापाराझींवर भडकली. (paparazzi)समांथा जिमच्या बाहेर येताना कोणाशी तरी फोनवर बोलत होती. आपल्या गाडीच्या जवळ आल्यावर तिने फोन ठेवली आणि रागात पापाराझींना “स्टॉप इट गाइस प्लीज” असे म्हणाली. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

जिम बाहेर समांथा रुथ प्रभू गडद तपकिरी रंगाच्या जिम आउटफिटमध्ये पाहायला मिळाली. नो मेकअप लूक, हाय पोनीटेल आणि कानात रिंग घालून तिने लूक पूर्ण केला होता. तिच्या हातात दोन बॉटल पाहायला मिळाल्या. तर ती फोनवर बोलत होती. तिच्या पापाराझींवर चिडण्यामागे नेमकं कारण अद्याप समजले नाही आहे. मात्र या व्हिडीओमुळे समांथाच्या आयुष्यात काहीतरी बिघडले असल्याच्या चर्चांना सोशल मीडियावर उधाण आले आहे.

फोनवर बोलताना समांथाच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसत आहे. अचानक तिचा मूड खराब होताना दिसतो आणि काही तरी गंभीर घडल्यासारखे वाटते. (paparazzi)समांथा रुथ प्रभूच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कमेंट्स येत आहेत. काहीजण तिच्या वागण्यावर नाराज झाले आहेत. तर काहीजण तिची काळजी करताना दिसत आहेत. सध्या समांथा रुथ प्रभूचे नाव दिग्दर्शक राज निदिमोरू यांच्याशी जोडलं जात आहे. त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

हेही वाचा :

छेड काढणाऱ्या तरुणाला तरुणींनी दाखवले तारे; लाथ मारली अन्…, Video Viral

बॉयफ्रेंड की मित्र? गर्लफ्रेंड रात्री कुणासोबत थांबणार? वाद टोकाला गेला अन्..मध्यरात्री नको ते घडलं

Love Marriage असो वा अरेंज मॅरेज, का तुटत आहेत नाती? प्रेमानंद महाराजांनी दिले मोठे कारण