मुंबईतील माहीम विधानसभा(assembly) मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. मनसेकडून अमित ठाकरे शिवसेना शिंदे गटाकडून सदा सरवणकर आणि शिवसेना ठाकरे गटाकडून महेश सावंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून माहीम विधानसभा मतदारसंघाची खूप चर्चा होताना दिसत आहे. तसेच माहीममध्ये अनेक राजकीय घडामोडी देखील घडल्याचे पाहायला मिळाले.
मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीच्या(assembly) मैदानात उतरल्याने महायुतीकडून उमेदवार दिला जाणार नाही असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. तसेच शिवसेना शिंदे गटाकडून सदा सरवणकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत सदा सरवणकर माघार घेणार असल्याचे बोलले जात होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सदा सरवणकर हे मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या दादर येथील निवासस्थानी भेटण्यास गेले होते. पण राज ठाकरेंनी सदा सरवणकरांची भेट नाकारली. भेटीनंतर राज ठाकरे जो आदेश देतील तो पाळणार होतो. भेट घेण्याचा सल्ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला होता, अशी प्रतिक्रिया सदा सरवणकरांनी दिली. आता राज ठाकरेंनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना यावर भाष्य केलं आहे.
मला सदा सरवणकर भेटायला आले होते. परंतु मी भेटलो नाही. कारण त्यांच्याशी काय बोलणार? त्यांच्याशी काय चर्चा करणार? हा विषय आता संपला आहे, असं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं. तसेच राज ठाकरेंनी चर्चा न करताच माहीममध्ये उमेदवार दिला, असं एकनाथ शिंदे म्हणाले होते. यावर देखील राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदेंची ही पहिली निवडणूक आहे. माझी चौथी-पाचवी निवडणूक आहे. त्यामुळे चर्चा काय करणार, असं राज ठाकरे म्हणाले. एकनाथ शिंदे याआधी ज्या पक्षात होते, त्यावेळी ते फक्त ठाणे बघत होते, असंही राज ठाकरेंनी सांगितले.
आज अमित ठाकरेंच्या विरोधात जी माणसे उभी आहेत, त्यांची सगळी अंडीपिल्ली बाहेर काढू शकतो, मात्र त्या घाणीत मला हात घालायचा नाही, असं राज ठाकरेंनी सांगितले. तुमच्या हाकेला 24 तास ओ देणारी माणसे हवीत. अमित राज ठाकरे असे जरी नाव असले तरी तुम्हाला त्याला भेटण्यासाठी अपॉईंटमेंटची गरज लागणार नाही, असंही राज ठाकरे म्हणाले.
हेही वाचा :
राज्यात किमान तापमानाचा आकडा 12 अंशांवर; कुठे पडलीये इतकी थंडी, कुठे चक्रीवादळाचं सावट
‘सुन लो ओवैसी तिरंगा…’ ; मुंबईतल्या सभेत पाकिस्तानचा उल्लेख करत फडणवीसांचा हल्लाबोल
‘चल आपण एकत्र काम करुयात,’ Zomato च्या CEO ने थेट सोशल मीडियावरुन तरुणाला दिली ऑफर