नुकत्याच समोर आलेल्या ट्रॅव्हल ऍडव्हायजरीमध्ये भारतीय पर्यटकांना(recently) काही देशांमध्ये प्रवास करायला सक्त मनाई करण्यात आली आहे. पण असं का आणि यामागे नेमकं कोणतं कारण आहे ते चला सविस्तर जाणून घेऊया.

सध्या थायलंड-कंबोडिया सीमेवरील वाढत्या तणावामुळे जगभरातील(recently) अनेक देशांनी प्रवास सल्ला जारी केला आहे. थायलंडमधील भारतीय दूतावासानेही थायलंड आणि कंबोडिया सीमेच्या आसपास भारतीय नागरिकांनी प्रवास टाळावा, अशी सूचना दिली आहे. ही पहिली वेळ नाही की भारत सरकारने अशा प्रकारचा सल्ला दिला आहे. यापूर्वीही भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने इराण, इस्रायल आणि काही अशांत देशांबाबत भारतीयांना प्रवास न करण्याचा सल्ला दिला होता.
भारतातील असे 3 शिवमंदिर जिथे मिळते खाण्यापिण्याची आणि राहण्याची फ्री सुविधा; यंदाच्या श्रावणात एकदा नक्की भेट द्या
या सल्ल्यांचे मुख्य कारण म्हणजे या देशांमधील अस्थिर सुरक्षा परिस्थिती, हिंसाचार, दहशतवादी हालचाली,(recently) तसेच प्रशासनातील कमकुवतपणा. आज आपण अशाच 7 देशांविषयी माहिती घेणार आहोत जिथे भारतीय नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, असा सल्ला दिला गेला आहे.

- कंबोडिया
इथे भारतीयांना फसव्या नोकरीच्या ऑफर देऊन त्यांची फसवणूक केली जाते. अनेक भारतीयांनी अशा बनावट ऑफरवर विश्वास ठेवून शोषण सहन केलं आहे. त्यामुळे दूतावासाने अशा ऑफरची सत्यता तपासूनच निर्णय घ्यावा आणि कायम दूतावासाशी संपर्कात राहावे, असे सांगितले आहे. शिवाय थायलंड-कंबोडिया सीमारेषेवरील तणावामुळे त्या भागात प्रवास करणे टाळावे. - म्यानमार
इथे अनेक भागांमध्ये, विशेषतः सीमावर्ती भागांमध्ये सशस्त्र संघर्ष सुरु आहेत. तसंच इंटरनेट व संपर्क सेवा वारंवार खंडित होत असल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. त्यामुळे भारतीयांना इथे प्रवास न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. जे नागरिक आधीच तिथे आहेत त्यांनी धोकादायक भागांपासून दूर रहावे व दूतावासात नोंदणी करावी. - इराक
इराकमध्ये सातत्याने हिंसा आणि दहशतवादाचा धोका असतो. तसंच तिथे आपत्कालीन सेवा फारच मर्यादित आहेत. त्यामुळे सध्याच्या अस्थिर वातावरणामुळे भारतीयांनी तिथे प्रवास टाळावा, असा सल्ला देण्यात आला आहे. - सीरिया
इथे सशस्त्र संघटनांच्या क्रिया सुरुवात आहेत. शहरांमधील प्रवास अत्यंत धोकादायक असून रस्त्यांवर अनेक वेळा स्फोटक उपकरणे सापडतात. त्यामुळे भारतीय नागरिकांनी सीरियात प्रवास पूर्णपणे टाळावा. - लिबिया
लिबियामध्येही सशस्त्र गट सक्रिय असून परिस्थिती अत्यंत असुरक्षित आहे. प्रवास करताना धोका अधिक आहे कारण रस्त्यांवर स्फोटकांचा धोका असतो. भारत सरकारने नागरिकांना लिबियामध्ये प्रवास न करण्याचा सल्ला दिला आहे.

महाराष्ट्रातील या गावात वसलंय जगातलं पहिलं भूमिज मंदिर; भगवान शिवाला समर्पित, पांडवांनी केली होती बांधणी
- लेबनान
सध्या लेबनानमध्ये वाढता तणाव, स्फोट, आणि सुरक्षेचा अभाव आहे. हिंसाचारग्रस्त भागांमध्ये विशेषत: जीवितास धोका आहे. जे भारतीय नागरिक आधीच लेबनानमध्ये आहेत त्यांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे आणि भारतीय दूतावासाशी संपर्कात रहावे. - बांगलादेश
येथील राजकीय अस्थिरता आणि आंदोलनांमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक भागांत निषेध, मोर्चे सुरू असल्याने भारत सरकारने प्रवास टाळावा अशी सूचना दिली आहे. जे लोक तिथे आधीच आहेत, त्यांनी सावधगिरी बाळगून केवळ सुरक्षित भागातच प्रवास करावा.
हेही वाचा :
भारतातील असे 3 शिवमंदिर जिथे मिळते खाण्यापिण्याची आणि राहण्याची फ्री सुविधा; यंदाच्या श्रावणात एकदा नक्की भेट द्या
महादेवी हत्तीणीसाठी नांदणी ते कोल्हापूरआत्मक्लेश मूक मोर्चा
“संशया”वरून दोष सिद्धी नाही “मालेगाव स्फोट”आरोपी निर्दोष