लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाला मिळणार ३००० रुपये? जाणून घ्या सरकारचा मास्टर प्लॅन

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना(scheme) लाभार्थींसाठी महत्त्वाची बातमी आहे. जुलैचा हप्ता अद्याप अनेक महिलांच्या खात्यावर जमा न झाल्याने संभ्रमाचे वातावरण होते. मात्र आता रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर दिलासा देणारी मोठी अपडेट समोर आली आहे.

राज्य सरकारच्या बहुचर्चित ‘लाडकी बहीण योजने’त २१ ते ६५ वयोगटातील दारिद्र्यरेषेखालील महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातात. गेल्या वर्षभरात तब्बल २ कोटींपेक्षा अधिक महिलांनी या योजनेचा(scheme) लाभ घेतला आहे. मात्र, जुलै महिन्याचा हप्ता ३१ जुलै उजाडूनही मिळालेला नाही. त्यामुळे ऑगस्टच्या सुरुवातीलाच रकमेच्या प्रतीक्षेत असलेल्या महिलांना आता थोडासा दिलासा मिळण्याची चिन्हं आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्य सरकारकडून रक्षाबंधन निमित्त लाभार्थी महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यांचा हप्ता म्हणजेच एकूण ३,००० रुपये एकत्र जमा करण्याची शक्यता आहे. या रकमेची अचूक तारीख अद्याप जाहीर झालेली नसली तरी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पैसे खात्यावर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, हे अनुदान महिन्याच्या अखेरीस किंवा ५ ऑगस्टपर्यंत मिळण्याचे नियोजन असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे रक्षाबंधनाच्या सणाच्या पार्श्वभूमीवर ‘लाडकी बहीण’ योजनेतून मिळणारी ही रक्कम बहिणींना एक खास भेट ठरणार आहे.

लाडकी बहीण योजनेत धक्कादायक प्रकार समोर :
ही योजना मूळतः दारिद्र्यरेषेखालील महिलांसाठी असली तरी अनेक अपात्र व्यक्तींनी त्याचा गैरफायदा घेतल्याचे उघड झाले आहे. १४ हजारांहून अधिक पुरुषांनी महिला म्हणून नोंदणी करून २१ कोटींहून अधिक रक्कम लाटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

तसेच २ हजारहून अधिक सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी वेतन घेत असतानाही या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. यामुळे सरकारकडून आता या अपात्र लाभार्थ्यांकडून रक्कम वसूल करण्याचे आदेश देण्यात आले असून संबंधितांवर कारवाईची प्रक्रिया सुरू झाली आहे.

हेही वाचा :

श्रावण महिन्यातील मासिक दुर्गाष्टमी कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा पद्धत

India vs England 5th Test : आता तरी मिळणार का अर्शदीपला शेवटच्या सामन्यात संधी? कोणाचा होणार पत्ता कट

महाराष्ट्रातील या गावात वसलंय जगातलं पहिलं भूमिज मंदिर; भगवान शिवाला समर्पित, पांडवांनी केली होती बांधणी