होळीपूर्वीच सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार मोठी गुड न्यूज?

केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी(employees) समोर आली आहे. केंद्र सरकारच्या कॅबिनेट बैठकीत महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. या निर्णयामुळे सध्या 53 टक्के असलेला महागाई भत्ता 56 टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. ही वाढ होळीपूर्वी लागू होण्याची अपेक्षा आहे.आज मंगळवार केंद्रीय कॅबिनेटची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्ता वाढीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. सध्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना 53 टक्के महागाई भत्ता मिळतो, जो 3 टक्क्यांनी वाढून 56 टक्क्यांवर जाऊ शकतो. हा निर्णय घेण्यात आल्यास मार्च महिन्याच्या पगारात नव्या दराने महागाई भत्ता लागू केला जाईल, तसेच जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांचा फरकही मिळेल.

या वाढीचा लाभ जवळपास 49 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 68 लाख पेन्शनर्सना होईल. केंद्र सरकार वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढवते. 1 जानेवारी ते जून आणि दुसरा जुलै ते डिसेंबर (employees)या कालावधीसाठी. त्यामुळे आगामी वेतनात ही वाढ कर्मचार्‍यांना प्रत्यक्ष दिसेल.सध्या सातवा वेतन आयोग लागू आहे, आणि त्याअंतर्गत महागाई भत्ता निश्चित केला जातो. मात्र, सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेची घोषणा केली आहे, परंतु अद्याप त्याची समिती स्थापन करण्यात आलेली नाही.

नवीन वेतन आयोगाच्या शिफारशी 1 जानेवारी 2026 पासून लागू होण्याची शक्यता आहेसरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात महागाई भत्ता कसा मोजला जातो, याचे उदाहरण घ्यायचे झाल्यास, (employees)जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार 18,000 रुपये असेल, तर सध्या 53 टक्के महागाई भत्ता त्याला 9,540 रुपये मिळतो. जर हा भत्ता 56 टक्क्यांवर गेला, तर तो 10,080 रुपये होईल. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात प्रत्यक्ष वाढ होणार आहे.

हेही वाचा :

पाचव्यांदा आई होणार सीमा हैदर; बेबी शॉवरचा व्हिडिओ तुफान व्हायरल

घरात मांजर पाळताय, सावधान! बर्ड फ्लूने घेतला 18 मांजरींचा बळी

इचलकरंजीत हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी जल फवारणी यंत्रणेची मागणी