महाराष्ट्रात थंडी वाढणार की कमी होणार? IMD ने वर्तवला अंदाज

महाराष्ट्रात हळूहळू गारठा जाणवू लागला आहे. कारण आता उत्तर महाराष्ट्रात चांगलीच हुडहुडी जाणवत आहे. अशातच गेल्या आठ दिवसांपासून उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे थंडीचा(weather) कडाका हळूहळू वाढू लागला आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात देखील गारठा वाढू लागला आहे.

मात्र आता भारतीय हवामान(weather) विभागाच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढणार असून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तापमान देखील 10 अंशांखाली जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात यावर्षी कडाक्याची थंडी राहणार असून नोव्हेंबरच्या शेवटी आणि डिसेंबरच्या सुरुवातीला महाराष्ट्रातील तापमान देखील कमी होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

त्यामुळे आता मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक भागातील किमान तापमान 10 अंशांखाली जाण्याचा अंदाज आहे. तसेच उत्तरेकडून वारे वाहण्याची शक्यता असल्याने थंडी देखील मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.

प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात पुढील चार ते पाच दिवस तापमानात काही फरक दिसणार नसला तरी देखील येत्या 24 तासानंतर 2 ते 3 अंशाने तापमान घसरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

तसेच कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात देखील पुढील तीन ते चार दिवसात तापमान कमी होणार असल्याचं प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईने सांगितलं आहे. याशिवाय पुढील चार ते पाच दिवसात विदर्भातील तापमानात काही फरक जाणवला नाही. दरम्यान, संपूर्ण राज्यात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.

हेही वाचा :

अजित पवारांचा ‘हा’ आमदार शरद पवारांच्या भेटीला

नागा चैतन्यवर समांथाचा निशाणा म्हणाली, ‘माझ्या Ex वर मी भरपूर…’

ते फडण’वीस’ असले तरी आपण ’20’ आहोत आपण पुरून उरू; उद्वव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले